आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जम्मू-काश्मीर:श्रीनगरमध्ये बीएसएफच्या पथकावर दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद; दोघांची हत्यारे बेपत्ता

श्रीनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 19 मे रोजी एनकाउंटरमध्ये सुरक्षादलाने हिजबुल मुजाहिदीनच्या 2 दहशतवाद्यांना मारले होते

श्रीनगरच्या पांडक परिसरात बुधवारी बीएसएफच्या गस्त घालणाऱ्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. बीएसएफ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत दोन जवान शहीद झाले आहेत. तसेच, त्यांची हत्यारेदेखील बेपत्ता आहेत. यापूर्वी, शनिवारी जम्मू-काश्मीरातील कुलगाम जिल्ह्यातील यारीपोराजवळ सुरक्षादल आणि पोलिसांच्या चेकपोस्टवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात जम्मू-काश्मीर पोलिसातील हेड कॉन्स्टेबल मोहम्मद अमीन शहीद झाले.

काश्मीरमध्ये मागील 13 दिवसात 3 मोठे एनकाउंटर

-19 मे, श्रीनगर: सुरक्षादलाने डाउनटाउन परिसरा हिजबुल मुजाहिदीनच्या 2 दहशतवाद्यांना मारले. यातील एक जुनैद सहराई होता, जो कट्टरतावादी संघटना तहरीक-ए-हुर्रियत प्रमुख मोहम्मद अशरफ सहराईचा मुलगा होता.

-16 मे, डोडा: सुरक्षादलाने डोडाच्या खोत्रा गावात हिजबुल मुजाहिदीनचा दहशतवादी ताहिरला 5 तासांच्या चकमकीनंतर मारले.

-6 मे, पुलवामा: सुरक्षादलाने हिजबुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर रियाज नायकूला मारले. तो दोन वर्षांपासून मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये सामील होता.

बातम्या आणखी आहेत...