आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Terrorist Attack On CRPF And Police Party In Baramulla, Kashmir, 2 CRPF Soldier And A Police Officer Martyred News And Updates

काश्मीरमध्ये 4 दिवसांत दुसरा दहशतवादी हल्ला:बारामूलात सुरक्षादलांवर दहशतवाद्यांचा गोळीबार, सीआरपीएफचे 2 जवान आणि एक पोलिस अधिकारी शहीद

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
  • 4 दिवसांत सुरक्षा दलावर दहशतवादी हल्ल्याची दुसरी घटना, 14 ऑगस्ट रोजी नौगममध्ये 2 पोलिस शहीद झाले होते

जम्मू-काश्मीरच्या बारामूला जिल्ह्यातील करीरी भागात दहशतवाद्यांनी सोमवारी सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त नाका तुकडीवर गोळीबार केला. या हल्ल्यात 3 जवान शहीद झाले. सीआरपीएफच्या 2 जवान आणि पोलिसांच्या एका स्पेशल अधिकाऱ्याला गोळी लागली होती. तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा मृत्यू झाला. या भागात घेराबंदी करून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

चार दिवसांत सुरक्षादलांवर दहशतवादी हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. 14 ऑगस्ट रोजी नौगाममध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात 2 पोलिस शहीद झाले होते. मागील काही दिवसांपासून पोलिस आणि सैन्याच्या दलावरील दहशतवादी हल्ले वाढले आहेत. 12 ऑगस्ट रोजी देखील बारामूलाच्या सोपोरमध्ये सुरक्षादलांवर हल्ला केला होता. ज्यामध्ये एक जवान जखमी झाला होता. दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त दलाला निशाणा बनवले होते.

दीड महिन्यांपूर्वी सीआरपीएफ दलावर झाला होता हल्ला

बारामूला जिल्ह्यातील सोपोर भागात 1 जुलै रोजी देखील सीआरपीएफच्या दलावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात एक जवान शहीद तर 3 जखमी झाले होते. दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक नागरिकाचा मृत्यू झाला होता. या व्यक्तीसोबत त्यांचा 3 वर्षीय नातू सोबत होता. सुरक्षा दलाने त्या मुलाल वाचवले होते.

बातम्या आणखी आहेत...