आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कश्मीरात दहशतवादी हल्ला:अनंतनागच्या बिजबेहडामध्ये सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला, एक जवान शहीद, एका मुलाचा मृत्यू 

श्रीनगर10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सतत चकमक
  • शुक्रवारी पुलवामाच्या त्रालमध्ये झालेल्या एन्काउंटरमध्ये 3 दहशतवादी मारले गेले

काश्मीरच्या बिजबेहडामध्ये शुक्रवारी सीआरपीएफच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये एक जवान शहीद झाला आहे. एका मुलाचा मृत्यू झाला आहे. सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये फायरिंग सुरू आहे.

जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षादलामध्ये सतत चकमकी सुरू आहेत. शुक्रवारी पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षादलाने 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. गुरुवारी बारामुला जिल्ह्याच्या सोपोर परिसरात 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

जम्मू-कश्मीरमध्ये या महिन्यात 15 एन्काउंटरमध्ये आतापर्यंत 46 दहशतवादी मारले गेले आहेत. दहशतवाद्यांना पकडण्याचे सत्रही सुरू आहे. बडगामच्या नरबल परिसरात बुधवारी आर्मी आणि पोलिसांनी कारवाई करुन लष्कर-ए-तोयबाच्या 5 साथीदारांना अटक केली होती.

बातम्या आणखी आहेत...