आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जम्मू-काश्मीरात दहशतवादी हल्ला:स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवसपूर्वी नौगाममध्ये पोलिस तुकडीवर हल्ला, दोन पोलिस शहीद

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरच्या नौगाममध्ये शुक्रवारी दहशतवाद्यांनी पोलिस तुकडीवर हल्ला केला. यामध्ये दोन पोलिस शहीद झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामधील दोन पोलिस कर्मचारी इश्फाक अयूब आणि फयाज अहमद यांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला. संपूर्ण परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

श्रीनगर शहराबाहेर हा दहशतवादी हल्ला झाला. यापूर्वी गुरुवारी सुरक्षादलाने पुलवामाच्या अवंतीपोरामध्ये दहशतवाद्यांचे तीन तळ उद्ध्वस्त केले होते.

गेल्या काही दिवसांमध्ये पोलिस पार्ट आणि सैन्याच्या ताफ्यावर होत असलेल्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. 12 ऑगस्टलाही बारामूलाच्या सोपोरमध्ये सुरक्षादलावर हल्ला करण्यात आला होता. यामध्ये जवान जखमी झाला होता. दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त पार्टीला निशाना बनवले होते.

0