आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Terrorist Caught In Delhi : Two Human Bomb Jackets And A Detonator Were Found In The House Of ISIS Terrorist Abu Yusuf, The Father Said The Police Should Forgive Him Once

यूपीमध्ये दहशतवाद्याच्या घरात सापडली स्फोटके:आयसिसचा दहशतवादी अबु युसुफच्या घरात दोन मानवी बॉम्ब जॅकेट आणि डेटोनेटर सापडले, वडील म्हणाले - पोलिसांनी त्याला एकदा माफ करावे

बलरामपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्लीतील चकमकीनंतर पोलिसांच्या विशेष पथकाने दहशतवाद्याला अटक केली होती
  • शनिवारी संध्याकाळी अबुला त्याच्या मूळ गावी आणले होते, तपासानंतर पथक दिल्लीकडे रवाना झाले

दिल्लीतून अटक केलेल्या आयसिसचा दहशतवादी अबू युसूफ उर्फ मुस्तकीमच्या उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथील घरी दोन मानवी बॉम्ब जॅकेट, स्फोटके, आयएसचा झेंडा आणि चिथावणीखोर साहित्य जप्त केले. यूसुफच्या पुतण्यासह तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर हे पथक दिल्लीला रवाना झाले. वडील वकील अहमद म्हणाले की, मला त्याच्या (मुलगा) या कृत्याबद्दल माहिती नव्हती. अन्यथा, त्याला थांबवले असते किंवा घराबाहेर काढले असते.

आयएसआयएसचा संशयित दहशतवादी अबू युसूफ याला घेऊन दिल्ली पोलिस बलरामपूरला पोहोचले होते
आयएसआयएसचा संशयित दहशतवादी अबू युसूफ याला घेऊन दिल्ली पोलिस बलरामपूरला पोहोचले होते

पोलिसांनी त्याला एकदा माफ करावे : वडील

वकील अहमद यांनी मुलाच्या वागणुकीबद्दल खेद वाटतो. ते म्हणाले की, पुर्वजांनी मिळवलेला आदर मुलाने मातीत मिसळला. तो हरवल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती. आता जे काही करायचे ते पोलिस करतील. मला असे वाटते की, पोलिसांनी त्याला एकदा माफ करावे. जर त्याने पुन्हा असे काही केल्यास तुम्ही त्याच्यासोबत काहीही करा.

वकिलांनी सांगितले की, युसुफच्या पाठीचा कणा सरकलेला आहे, त्याच्यावर 2 वर्षांपासून लखनऊमध्ये उपचार सुरू आहेत. शुक्रवारी मामाच्या मुलाच्या मूत्रपिंडाच्या उपचारासाठी तो लखनऊला गेला होता. त्याने आपल्या बहिणीला सांगितले की तो तिच्या घरी थांबेल, पण तिथे पोहोचला नाही आणि त्याचा फोन बंद येऊ लागला.

वडील वकील अहमद
वडील वकील अहमद

पत्नी म्हणाली - गन पावडर गोळा करत होता

दहशतवादी अबू युसूफच्या बलरामपूरमधील घरातून जप्त केलेले सामान
दहशतवादी अबू युसूफच्या बलरामपूरमधील घरातून जप्त केलेले सामान

युसूफच्या पत्नीने सांगितले की, तो घरात गन पावडर आणि इतर अनेक वस्तू गोळा करीत होता. जेव्हा मी असे न करण्यास सांगितले तेव्हा तो म्हणाला की मला त्याला थांबविण्याचा अधिकार नाही. शक्य असल्यास पोलिसांनी त्याला माफ करावे. मला चार मुले आहेत. अशात मी कुठे जाणार?

भाऊ म्हणाला - काल आयसिसचा झेंडा बघितला

अबु युसूफचा भाऊ आकिब म्हणाला की, मला आयसिसच्या झेंड्याची ओळख नाही मात्र रात्री तो झेंडा पाहिला. काळ्या रंगाच्या झेंड्यावर पांढऱ्या रंगाने अरबी भाषेत 'अल्लाह हू अकबर ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुन रसूलुल्लाह' लिहिले होते. तो सौदी आणि इतर ठिकाणी राहिलेला आहे.

अबु युसूफचा भाऊ आकिब आणि घरातून जप्त केलेला आयसिसचा झेंडा
अबु युसूफचा भाऊ आकिब आणि घरातून जप्त केलेला आयसिसचा झेंडा
0