आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Terrorist, Director General Of Police Dilbag Singh's Statement Behind The Grenade Attack In Srinagar|Marathi News

ग्रेनेड हल्‍ला:श्रीनगरमधील ग्रेनेड हल्ल्यामागे दहशतवादी , पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांचे प्रतिपादन

कठुआ7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगरमध्ये अलीकडेच झालेल्या ग्रेनेड हल्ल्यामागे दहशतवादी आहेत. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला तर ३२ जण जखमी झाले. या घटनेत स्फोट घडवण्यात आला होता, असे जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंह यांनी सांगितले.हे दहशतवादी कृत्य आहे. शत्रू पक्ष सातत्याने गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य करत आले. पूर्वीही दहशतवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलास यश मिळाले आहे. दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांना लक्ष्य केले. आता दहशतवाद्यांचे नवे मॉड्यूल सक्रिय झाले आहे. त्यांचाही खात्मा करण्याची मोहीम राबवली जात आहे. अमली पदार्थ, शस्त्रास्त्रांची तस्करी रोखण्यासाठी कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. या कारवायांना रोखण्यासाठी सामान्य जनतेचा पोलिसांना पाठिंबा आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...