आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राउंड रिपोर्ट:काश्मीरमधील अपयशानंतर जम्मूमध्ये हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट

जम्मू / मोहित कंधारीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जम्मूत दहशतवादी कारवायांत अचानक वाढ का ?

हिजबुल मुजाहिदीन, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहंमदसारख्या दहशतवादी संघटना जम्मू भागात जवाहर बोगद्याजवळ हल्ल्याचा कट करू लागल्या आहेत. राजौरी व पूंछ या सीमेवरील जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरून प्रशिक्षित दहशतवाद्याला घुसखोरीसाठी पाठवले जात आहे. दहशतवाद्यांच्या आर्थिक पोषणासाठी या भागात ड्रगच्या व्यवसायाला प्रोत्साहन दिले जात आहे. अलीकडच्या काही आठवड्यांत पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत सुमारे २ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. त्याव्यतिरिक्त राजौरीच्या थानामंडी, सुंदरबनी भागातही अनेक चकमकी घडू लागल्या आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनाही धक्का बसला आहे. सध्या पूंछमध्येही घुसखोरीचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे दिसतात. लष्करी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या भागात पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांनी दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण शिबिरांना सक्रिय केले आहे.

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांना झालेल्या प्रचंड हानीची भरपाई म्हणून जम्मूत दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न केला जात आहे. डोडा, किश्तवाड, रामबनच्या डोंगराळ जिल्ह्यात दुर्गम भागात शस्त्रे, दारूगोळ्याची खेप रवाना केली जात आहे. सीमेवरील सांबा व कंठुआ ‘ड्रोन’ च्या समस्येला तोंड देत आहेत. येथे रेडिमेड आयईडीसह शस्त्रांची खेप नियमितपणे साेडली जात आहे. गर्दीची ठिकाणे तसेच महत्त्वाची सार्वजनिक ठिकाणे दहशतवाद्यांच्या रडारवर आहेत. २७ जून २०२१ रोजी जम्मूच्या हवाई दलाच्या स्थानकावर ड्रोन हल्ला झाल्यानंतर ड्रोन स्पॉटिंगच्या डझनावर हल्ले करण्यात आले. यावरून दहशतवाद्यांनी स्थानिकांच्या मदतीने कारवायांचा कट केलेला दिसतो. घटनांमागे काही पॅटर्न आहे का, याचा शोध घेतला जात आहे. परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.

चकमकीत वाढ
जम्मू-काश्मीर पोलिसांनुसार जुलै २०२१ पासून आतापर्यंत जम्मू भागात दहशतवाद्यांशी पाच चकमकी झाल्या. त्यात सात दहशतवाद्यांचा सफाया झाला. तीन जवान शहीद झाले. पोलिसांनी १० ऑगस्ट रोजी पूंछमध्ये २५.८१ लाख रुपयांची हवाला रक्कम जप्त केली होती. जप्तीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी रक्कम मानली जाते. १३ ऑगस्ट रोजी सीमावर्ती जिल्ह्यात पहिल्यांदाच काही बाॅम्ब जप्त केेले होेते.

बातम्या आणखी आहेत...