आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरेकी हल्ला:जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा काश्मिरी पंडितावर हल्ला,  शोपियांमधील घटना, दिवसभरातील हल्ल्याची तिसरी घटना

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात अतिरेक्यांनी एका काश्मिरी पंडितावर हल्ला केला आहे. त्यात हा पंडित गंभीर जखमी झाला असून, त्याला श्रीनगर स्थित लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी जखमीचे नाव सोनू कुमार बालजी असल्याचे सांगितले आहे. जम्मू काश्मिरातील अतिरेकी हल्ल्याची सोमवारची ही तिसरी घटना आहे. जखमी पंडित शोपियांच्या चौगाम गावचा रहिवासी आहे. तिथे त्याचे एक दुकान आहे. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा रक्षकांनी चौगाममध्ये धाव घेऊन कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केले. पण, सायंकाळी उशिरापर्यंत हल्लेखोरांचा शोध लागला नाही.

तत्पूर्वी, दिवसभरात अतिरेक्यांनी 2 वेगवेगळ्या घटनांत बिहारी मजूर व सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला होता. यात मैसुमा भागातील हल्ल्यात सीआरपीएफच्या एका जवानाला वीरमरण आले होते. तर अन्य एक जवान जखमी झाला होता. तत्पूर्वी, सकाळी पुलवामा जिल्ह्यात अतिरेक्यांनी बिहारच्या 2 मजुरांवर हल्ला केला होता.

बातम्या आणखी आहेत...