आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाश्मीरमध्ये सुरक्षा दल व लष्कराने जुन्या दहशतवादी संघटनांचा खात्मा केला असला तरी आता नव्या दहशतवादी संघटना डोके वर काढू लागल्या आहेत. पाकिस्तानच्या पाठिंब्यावर या संघटना सक्रिय होत आहेत. गुप्तहेर संघटनांना अशा सहा नव्या संघटनांची माहिती मिळाली आहे. पाकमधून लष्कर-ए-तोयबा, इंडियन मुजाहिदीन, अल-बदर यांच्याकडून नव्या संघटनांना आर्थिक रसद पुरवठाही केला जात आहे. एवढेच नव्हे तर आता दहशतवादी संगणकीय प्रणालीला आपले शस्त्र म्हणून वापरू लागले आहेत.
सरकारी संस्था व लष्करी तळावर सायबर हल्ल्यासाठी या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. दहशतवाद्यांच्या नव्या मॉड्युलची माहिती मिळताच एनआयए अॅक्शन मोडमध्ये आले आहे. एनआयएने मंगळवारी १६ संशयित दहशतवाद्यांच्या अड्यांवर काश्मीरमध्ये छापेमारी केली होती. गुप्तहेर संस्थांना मिळालेल्या माहितीनुसार काश्मीरच्या अनंतनाग, सोपियां, कुलगाम, बारामुल्ला, बडगाम व श्रीनगरमध्ये व जम्मूच्या पूंछ, राजौरी व किश्तवाड भागात गेल्या काही काळापासून नवीन दहशतवादी संघटना द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ), युनायटेड लिबरेशन जम्मू अँड काश्मीर (यूएल-जे अँड के), मुजाहिदीन गजवा-ए हिंद (एमजीएच), जम्मू-काश्मीर फ्रीडम फायटर्स (जेकेएफएफ), पीएएफएफ ,केटी) सक्रिय आहेत.
जी-20 : बैठकीसाठी अतिरिक्त सुरक्षा तैनात
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.