आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Terrorists Snatched The Only Sons Of Two Families; People Are Angry And Leader Is Frightened

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राऊंड रिपोर्ट:अतिरेक्यांनी दोन कुटुंबांतील एकुलती मुले हिरावून नेली; लोकांमध्ये आक्रोश, धमक्यांमुळे पंचायत सदस्य देताहेत राजीनामे

कुलगाम/श्रीनगर / मुदस्सीर कुलूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाकच्या कबुलीनंतर भारताची आयसीजेत जाण्याची तयारी

खोऱ्यात तरुण नेत्यांच्या हत्येचा कट फक्त कुलगामपुरताच मर्यादित नाही. कलम ३७० रद्द केल्यानंतर बदललेल्या वातावरणात युवक मुख्य प्रवाहात येतील, असा धोका दहशतवाद्यांना वाटत आहे. कारण काश्मिरी युवकांच्या बळावरच सरहद्दीपलीकडे बसलेले दहशतवादी येथे दहशत निर्माण करत आहेत. त्यामुळे युवकांना मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न आहे. गुरुवारी भाजप नेते फिदा हुसेन, उमर राशिद आणि उमर हाजम यांची हत्याही याच कटाचा भाग आहे.

दहशतवाद्यांनी हल्ल्यात दोन कुटुंबांतील एकुलती एक मुले हिरावून नेली आहेत. फिदा हुसेन कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. आई-वडील वृद्ध आहेत. दोन बहिणी आहेत. ‘आता आम्ही कुणाच्या भरवशावर जगावे?’ असा टाहो त्याच्या आईने फोडला. वडील तर बोलण्याच्या मन:स्थितीतही नव्हते. उमर राशिदच्या कुटुंबाचीही अशीच स्थिती आहे. तिघांच्या अंत्यसंस्काराला हजारो लोक उपस्थित होते. या हत्यांमुळे लोक अत्यंत संतप्त आहेत, तर नेत्यांमध्ये दहशत आहे. पंचायत सदस्यांवरील हल्ले सुरूच आहेत. त्यामुळे अनेक पंचायत सदस्य राजीनामे देत आहेत. नेते सुरक्षेची मागणी करत आहेत.

हल्लेखोरही याच भागातील, दोघेही ‘लष्कर’शी संबंधित
आयजी विजयकुमार यांनी सांगितले की, हत्या करणारे अतिरेकीही याच भागातील आहेत. निसार अहमद खांडे आणि अब्बास शेख अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही लष्कर-ए-तोयबाशी संबंधित आहेत.

पाकच्या कबुलीनंतर भारताची आयसीजेत जाण्याची तयारी
पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानी मंत्री फवाद चौधरींच्या कबुलीनाम्यानंतर भारत आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) जाऊ शकतो. केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के.सिंह म्हणाले, यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे भारत पूर्वीपासून सांगत आहे. त्यांनीच सत्य स्वीकारले हे चांगले झाले. आमचे सरकार कबुलीनाम्याचा वापर पाकचा खरा चेहरा जगासमोर आणून त्याचा एफएटीएफच्या काळ्या यादीत समावेश करण्यासाठी करेल, असा विश्वास आहे. सध्या पाक करड्या यादीत असून मागील बैठकीत पाकला यात कायम ठेवण्यात आले.