आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Tesla, Elon Musk News And Updates; US Electric Car Maker Tesla Finally Enters India, To Open Office In Bangalore Soon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टेस्लाची भारतात एन्ट्री:अमेरिकेतील इलेक्ट्रिक कार कंपनी 'टेस्ला'ची अखेर भारतात एन्ट्री, बंगळुरूत लवकरच सुरू होईल ऑफीस

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंपनीने भारतातील युनिटसाठी तीन संचालकांची नियुक्ती केली आहे

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी 'टेस्ला'ची भारतामध्ये एन्ट्री झाली आहे. अमेरिकन कार कंपनी टेस्लाने आपल्या भारतातील पहिल्या ऑफीससाठी बंगळुरुची निवड केली आहे. यापूर्वी मस्क यांनी अनेकदा ट्विटरवरुन याबाबतचे संकेत दिले होते. अखेर त्यांनी टेस्लाची 8 जानेवारी रोजी भारतामध्ये नोंदणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टेस्ला कंपनीने बंगळुरुमधील रिचमंड सर्कल जंक्शन भागात टेस्ला कंपनीचे ऑफिस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच ठिकाणी कंपनीचे संशोधन आणि विकास ऑफिसदेखील असेल. 'टेस्ला इंडिया मोटर्स आणि एनर्जी' असे भारतातील कंपनीला नाव देण्यात आले आहे. यासाठी कंपनीने भारतामधील कामकाज पाहण्यासाठी तीन संचालकांची नियुक्ती केली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी टेस्लाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले की,'कर्नाटक ग्रीन मोबिलिटीच्या दिशेने भारताला घेऊन जाईल. इलेक्ट्रिक व्हेइकल मॅन्युफॅक्चरर टेस्ला लवकरच बंगळुरूमध्ये आर अँड डी युनिटद्वारे आपले काम सुरू करणार आहे. मी भारत आणि कर्नाटकमध्ये इलोन मस्कचे स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.'

नितीन गडकरी यांच्याकडूनही वृत्ताला दुजोरा

यापूर्वी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर 2020 मध्ये टेस्ला भारतात येणार असल्याचे म्हटले होते. गडकरी म्हणाले होते की, 'अमेरिकेतील ऑटो क्षेत्रातील मोठी कंपनी टेस्ला पुढील वर्षी भारतात आपल्या कारच्या वितरणासाठी केंद्र सुरू करणार आहे. मागणीच्या आधारावर कंपनी इथे वाहन निर्मितीचा कारखाना सुरू करेल. पुढील पाच वर्षात जगातील सर्वात मोठा इलेक्ट्रिक वाहन उत्पादक बनण्याची क्षमता भारतात आहे.'

बातम्या आणखी आहेत...