आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादहून पुण्याला लवकरच विमानसेवा:केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची ग्वाही

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादहून पुणे, अहमदाबाद आणि नागपूर येथून नव्याने विमानसेवा सुरू करण्याची ग्वाही केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी व पदाधिकाऱ्यांना सिंधिया यांनी बैठकीसाठी दिल्ली येथे आमंत्रित केले होते. सदर बैठकीत चर्चा करताना त्यांनी ही ग्वाही दिली. ललित गांधी यांनी महाराष्ट्रातील विविध विमानतळांच्या सद्यस्थितीचा व महाराष्ट्राच्या अपेक्षांचा अहवाल त्यांना सादर केला.

जळगाव, नांदेड, गोंदिया व लातूर या विमानसेवेसाठी पूर्ण असलेल्या विमानतळावरून त्वरित विमानसेवा सुरू करावी औरंगाबादहून पुणे, नागपूर, अहमदाबाद या ठिकाणी थेट विमानसेवा ताबडतोब सुरू करावी, अशी मागणी गांधींनी केली. त्यावर सिंधिया यांनी लकवरच याबाबत बैठक घेऊ, असे आश्वासन दिले.

बातम्या आणखी आहेत...