आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Testing Of Indian Corona Vaccine At Delhi AIIMS, 375 In The First Phase, 750 In The Second Phase

कोरोनावर लस:दिल्ली एम्समध्ये भारतीय लसीची चाचणी, पहिल्या टप्प्यात 375, दुसऱ्या टप्प्यात 750 चाचण्या

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विविध वयोगटांच्या लोकांवर या चाचण्या केल्या जातील

कोरोनावर पहिली स्वदेशी लस कोवॅक्सिनची शुक्रवारी एम्समध्ये मानवी चाचणी सुरू झाली. पहिल्या दिवशी ३० वर्षीय तरुणास डोस देण्यात आला. कोणतेही दुष्परिणाम दिसून न आल्याने त्यास घरी सोडण्यात आले. शनिवारी इतर लोकांवरही चाचणी होईल.

एम्समध्ये कोविड व्हॅक्सिनचे प्रमुख संशोधक व कम्युनिटी मेडिसीनचे प्रा. डॉ. संजय राय यांनी सांगितले, दिल्लीतील पहिल्या व्यक्तीची दोन दिवस तपासणी करण्यात आली. त्याचे सर्व अहवाल चांगले आले. पहिला डोस ०.५ एमएल दुपारी १.३० वाजता देण्यात आले. दोन तासांनंतरही त्याच्यावर दुष्परिणाम दिसून न आल्याने त्याला घरी पाठवण्यात आले. आता त्याच्यावर सात दिवस लक्ष ठेवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ३७५ लोकांवर चाचणी होईल. यापैकी १०० एम्समधील असतील. लसीच्या आधी व दुसऱ्या टप्प्याच्या चाचणीत कमीत कमी ६० दिवसांचा कालावधी लागतो. ही मानके जगभरात आधीपासूनच ठरलेली आहेत.

पहिल्या टप्प्यात ३७५, दुसऱ्या टप्प्यात ७५० चाचण्या
एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले, आयसीएमआरने ज्या १२ साइट्सची निवड केली त्यापैकी दिल्ली एम्स एक आहे. पहिल्या टप्प्यात ३७५ स्वयंसेवकांवर चाचणी होईल. यापैकी १०० एम्समधील असतील. यात यश आल्यावर दुसऱ्या टप्प्यात सर्व १२ साइट्स मिळून ७५० स्वयंसेवकांवर चाचणी होईल. विविध वयोगटांच्या लोकांवर या चाचण्या केल्या जातील.