आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोल्हापूरचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांना मंत्रिमंडळात बढती मिळणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. सतेज पाटील हे सध्या गृहराज्य मंत्रिपद सांभाळतात. मात्र त्यांना आता काँग्रेसकडून कॅबिनेट मंत्री म्हणून बढती दिली जाण्याची शक्यता आहे. केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर ठाकरे सरकारमध्येही लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपद देखील रिक्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या पदावर कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होऊन सतेज पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले जाऊ शकते. अनेक मंत्र्यांकडून सतेज पाटलांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याचा आग्रह केला जात आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरातांसह सतेज पाटील यांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात कॉंग्रेसला दुसरे कॅबिनेट मंत्रिपद मिळू शकते.
मंत्रिमंडळ फेरबदला दोन काँग्रेस मंत्र्यांना मिळणार डच्चू?
राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचे बोलले जात आहे. या दरम्यान कॉंग्रेसच्या दोन मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची शक्यता आहे. एका राज्यमंत्र्याला कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळण्याचा अंदाज आहे यात गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांना बढती मिळू शकते. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीच्या निमित्ताने एका विद्यमान मंत्र्याला अध्यक्षपदी विराजमान केले जाईल असेही बोलले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.