आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Thackeray Group's Demand For A Seven member Bench; Seeking To Review The Judgment Of The Supreme Court

महाराष्ट्र सत्तासंघर्ष:सातसदस्यीय पीठाची ठाकरे गटाची मागणी; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे पुनरावलोकन करण्याची मागणी

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्ष प्रकरणात आमदार अपात्रतेच्या याचिकांवर सातसदस्यीय पीठासमोर सुनावणी करण्याची मागणी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात केली आहे. सन २०१६ मध्ये नबाम रबिया खटल्याचा निकाल पाचसदस्यीय घटनापीठाने दिला होता. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस असल्यास अध्यक्ष आमदारांना अपात्र ठरवू शकत नाहीत, असे निकालात म्हटले आहे. या निकालाचे पुनरावलोकन करण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे.

सुनावणी १० जानेवारीला पुढील सुनावणी १० जानेवारी रोजी होईल. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी ७ सदस्यीय घटना पीठासमोर संक्षिप्त टिपण सादर करणार असल्याचे सांगितले. त्यावर दरम्यानच्या कालावधीत आपापल्या दस्तऐवजांची पूर्तता करून घ्यावी, असे निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील ५ सदस्यीय घटनापीठाने दिले. सिब्बल यांनी टिपण आधी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि संबंधित प्रतिवाद्यांना द्यावे, असेही निर्देश कोर्टाने दिले.

बातम्या आणखी आहेत...