आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Thaksen', A Billionaire, Came To See The Girl; Police Arrested Him As Rickshaw Puller, Jailed Before Marriage; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:​​​​​​​कोट्यवधींचा गंडा घालणारा ‘ठकसेन’ मुलगी पाहण्यासाठी आला; पोलिसांनी रिक्षाचालक बनून केली अटक, लग्न जमण्यापूर्वी तुरुंगात

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बनावट दागिने गहाण ठेवून बँकेची फसवणूक करणारा 18 महिन्यांनी जेरबंद

लोखंड, पितळ, चांदीच्या दागिन्यांना सोन्याचा मुलामा देऊन ते बँकेत गहाण ठेवून काेट्यवधींचे गोल्ड लोन लाटणाऱ्या टाेळीचा घाेटाळा गेल्या वर्षी उघडकीस आला हाेता. या घाेटाळ्यात सुरुवातीला तक्रार देणारा फिर्यादी सतीश ऊर्फ संतोष बाबुराव नाईक (३१, रा. गुरुजन हाउसिंग सोसायटी, रोपळेकर चौक) हाच आराेपी असल्याचे उघड झाले हाेते. १८ महिन्यांपासून पसार असलेल्या या आराेपीला वेदांतनगर पाेलिसांनी रिक्षाचालक बनून, वेशांतर करून अतिशय शिताफीने पकडले.

या घाेटाळ्यात सोन्याची तपासणी करणारे सराफा व्यावसायिकच सहभागी हाेते. बनावट साेने खरे असल्याचे प्रमाणपत्र ते बँकांना द्यायचे. अशाच पद्धतीने एका शिक्षण संस्थाचालकासह २५ ते ३० जणांच्या टोळीने बनावट दागिन्यांवर कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलले. गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक मधुकर सावंत यांनी तपास केला, तेव्हा बालाजीनगरातील सचिन जगनराव शहाणे याने निशांत मल्टिस्टेट बँकेत हा प्रकार केल्याचे समोर आले. त्यानंतर यात सतीश नाईक, शरद जगन्नाथ शहाने, रवी सूर्यकांत गायकवाड आदींचीही नावे पुढे आली. बँकेचा गोल्ड व्हॅल्युअर शरद शहाणे याच्या मदतीने नाईकने हा घाेटाळा केल्याचे समाेर आले हाेते. मात्र, गुन्हा दाखल होताच नाईक शहरातून फरार झाला होता.

या रॅकेटमध्ये शिक्षणसंस्था चालक अॅड. गंगाधर मुंढे व त्यांचा भाऊ मंगेश मुंढे यांचे नावदेखील समोर आले. सुरुवातीला क्रांती चौक पाेलिसात १२ जणांवर गुन्हा दाखल झाला. नंतर सतीश नाईकवर वेदांतनगर ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल झाला. अहमदनगरपर्यंत या घाेटाळ्याचे धागेदोरे पोहोचले होते. विशेष म्हणजे, बँकांचा अधिकृत गोल्ड व्हॅल्युअरच आरोपींना मिळाल्याने बँकाही अंधारातच हाेत्या. दरम्यान, नाईक २०१२ पर्यंत अट्टल मंगळसूत्र चोर होता. त्याच्यावर बीड, जालना व शहरात दहापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

पत्ता विचारण्याचा बहाणा करून पाेलिसांनी पकडले
११ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल होताच नाईक हैदराबादला जाऊन लपला. २७ जुलै रोजी तो शहरात आल्याची खबर पाेलिसांना मिळाली. निरीक्षक रामेश्वर रोडगे, उपनिरीक्षक प्रमोद देवकते यांनी वेशांतर करून त्याला पकडण्याचे नियोजन केले. देवकते रिक्षाचालक तर इतर कर्मचारी प्रवासी बनले. रिक्षा घेऊन ते नाईक उभ्या असलेल्या ठिकाणी गेले. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याला धरले. नाईकचे नुकतेच लग्न ठरले हाेते. मंगळवारी मुलीकडचे लाेक घरी येणार असल्याने रविवारी तो औरंगाबादला आला हाेता. मात्र संध्याकाळी पाहुणे येण्यापूर्वीच तो तुरूंगात गेला.

बातम्या आणखी आहेत...