आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईजवळील ठाण्यात मागील दोन दिवसात दोन नगरसेवकांचा कोरोना संक्रमणामुळे मृत्यू झाला आहे. रात्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या एका नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मंगळवारी पहाटे शिवसेनेच्या एका नगरेवकाने आपली जीव गमावला आहे. यापूर्वी मीरा भायंदर नगर पालिकेतील एका 55 वर्षीय नगरसेवकाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
14 दिवसांपूर्वी झाली कोरोनाची लागण
ठाण्यात आज मृत्यू झालेल्या नगरसेवकात 14 दिवसांपूर्वी कोरोनाची पुष्टी झाली होती. त्यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते. पक्षाने सांगितले की, संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली. दरम्यान,त्यांना आधीपासून डायबिटीज आजार असल्याची माहिती आहे.
शिवसेनेच्या नगरसेवकचा संक्रमणामुळे मृत्यू
यापूर्वी मीरा-भांयदरमध्ये शिवसेनेच्या एका नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तो दोन आठवड्यांपासून मिरा भायंदरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांना निधनावर दुःख व्यक्त केले आहे.
मुंबईत आतापर्यंत 1,758 मृत्यू
मागील 24 तासात मुंबईत कोरोनामुळे 1,015 नवीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बीएमसीने सांगितल्यानुसार, मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 50,878 झाली आहे. यातील 22,942 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मंगळवारी 904 रुग्णांना घरी पाठवण्यात आले. शहरात आतापर्यंत 1,758 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.