आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • That The Students Did Not Take The Final Year Exams, The UGC Filed An Affidavit In The Supreme Court

तिढा कायम:अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या नाही तर विद्यार्थ्यांचे नुकसानच, यूजीसीने सर्वाेच्च न्यायालयात दाखल केले शपथपत्र

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभरातील महाविद्यालये आणि विद्यापीठांत पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ३० सप्टेंबरपर्यंत घेण्यामागे विद्यार्थ्यांचे भवितव्य सावरणे आहे, असे विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) म्हटले आहे.

यूजीसीने परीक्षा घेण्याबाबतच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या प्रत्युत्तरात गुरुवारी सर्वाेच्च न्यायालयात सांगितले की, अंतिम वर्षाच्या निकालाच्या आधारावर विद्यार्थ्यांचे भवितव्य अवलंबून असते. यामुळे परीक्षा न घेताच निकाल जाहीर केला जाऊ शकत नाही.

यूजीसीचे शैक्षणिक अधिकारी डाॅ. निखिलकुमार यांनी सुप्रीम कोर्टात ५० पानी शपथपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी कोर्ट शुक्रवारी सुनावणी करणार आहे. यूजीसीकडून ६ जुलैला पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ३० सप्टेंबरपर्यंत घेण्याचा आदेश सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांना जारी करण्यात आला आहे. कोरोनाच्या धोक्याकडे पाहता २० विद्यार्थ्यांनी परीक्षा घेण्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र,पंजाब,बंगाल, दिल्लीसह देशातील १० राज्यांमध्ये विद्यापीठ पातळीवरील अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाचा अभ्यासक्रम संपताच इंटर्नशिप सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.त्यास केंद्रिय परिषदेने नकार दिला असून शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात त्यावर अंतिम सुनावणी आहे.