आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत मृत तरुणीचा उत्तरीय अहवाल:‘त्या’ तरुणीचा जखमांमुळे मृत्यू, अत्याचारामुळे नाही

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीच्या कंझावला भागात अंजली सिंहचा मृत्यू रस्ते दुर्घटनेतील गंभीर जखमांमुळे झाला आहे. स्कूटरस्वार तरूणीला कारने सुमारे १२ किलोमीटर फरफटत नेले होते. सुरूवातीच्या उत्तरीय तपासणी अहवालात तिच्यावर अत्याचार झाला नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

जखमांच्या खुणा लक्षात घेऊन अंजलीला अनेक किलोमीटर अंतर फरफटत नेल्याचे स्पष्ट होते. त्यातून झालेल्या जखमांतून तिला धक्का बसला व तिने प्राण सोडले. मंगळवारी तरूणीवर अंत्यसंस्कार झाले. अंजलीचा मृतदेह एक जानेवारीला एका कारच्या मागील भागात आढळून आला होता. तो निर्वस्त्र होता. त्यामुळे प्राथमिक पातळीवर अत्याचाराचा संशय व्यक्त केला जात होता. पोलिसांनी कारमधील पाच आरोपींना अटक केली आहे. ते पोलिस रिमांडमध्ये आहेत. त्यांच्या रक्ताचे नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यांची चौकशी केली जात आहे. ही तरूणी कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा एकमेव आधार होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंजली यांच्या आईला फोनवरून संवाद साधला. खटला लढण्यासाठी सर्वात मोठा वकील लावला जाईल. कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली.

भीतीमुळे पळाले...
घटनेच्या आधी तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणीचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. एक अधिकारी म्हणाले, मी प्रत्यक्षदर्शी आहे. तेव्हा पोलिसांची मदत घेण्यासाठी संपर्काचा प्रयत्न केला होता. तिला काहीही जखम झाली नाही. घटनेच्या वेळी ती घाबरलेली होती. त्यामुळे आपण पळून गेल्याचे मैत्रिणीचे म्हणणे आहे. मैत्रिणीचा जबाब महत्वाचा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे दोषींना शिक्षा होऊ शकेल. ही तरूण आणि अंजली यांच्यात हॉटेलमध्ये आणि बाहेर देखील खूप वेळ भांडण चालले होते. अनेकांनी त्यांना सोडवले. अंजलीने मद्यपान केल्याचेही या मैत्रिणीच्या हवाल्यावरून सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...