आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The 106 year old Overcame Corona Virus, Who Was 4 Years Old At The Time Of The Spanish Flu Outbreak;

कोरोनावर विजय:106 वर्षीय वृद्धाची कोरोनावर मात, स्पॅनिश फ्लूच्या साथीच्या वेळी होते 4 वर्षांचे; 70 वर्षांच्या मुलानेही जिंकले युद्ध

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरी परतलेले मुख्तार अहमद. - Divya Marathi
घरी परतलेले मुख्तार अहमद.
  • 1918 मध्ये आलेल्या स्पॅनिश फ्लू महामारीवर अन् आता कोरोनावर मात केलेली ही देशातील पहिली व्यक्ती

दिल्लीत शंभरहून अधिक वय असलेले एक वृद्ध कोरोनातून अगदी पूर्णपणे बरे झाले. १९१८ मध्ये स्पॅनिश फ्लूची साथ आली तेव्हा ते ४ वर्षांचे होते. त्यांच्या मुलाचे वय ७० वर्षांचे आहे. राजीव गांधी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, १०६ वर्षीय एका रुग्णाला नुकतीच रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णालयात त्यांची पत्नी, मुले आणि कुटुंबातील अन्य सदस्यांनाही घरी पाठवण्यात आले आहे. एका डॉक्टरांनी सांगितले, “१९१८ मध्ये आलेल्या स्पॅनिश फ्लू महामारीवर अन् आता कोरोनावर मात केलेली ही देशातील पहिली व्यक्ती आहे. स्पॅनिश फ्लूने तेव्हा जगभर हाहाकार माजवला होता. विशेष म्हणजे त्यांच्या वृद्ध मुलापेक्षा ते कोरोनातून लवकर बरे झाले. दुसरीकडे, डॉक्टरही आश्चर्यचकित आहेत. कारण, काेरोनाचा धोका वृद्धांनाच अधिक आहे.’ एक अन्य डॉक्टर म्हणाले, “या वृद्ध व्यक्तीस स्पॅनिश फ्लू झाला होता की नाही हे माहिती नाही. त्या काळातील दस्तऐवज आम्ही पाहिलेले नाहीत. दिल्लीत त्या काळात बरीच रुग्णालये होती... परंतु हे आश्चर्यकारक आहे की १०६व्या वर्षीही या व्यक्तीत जगण्याची एवढी ऊर्मी आहे.’

बातम्या आणखी आहेत...