आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिहारच्या मुजफ्फरपूरमधील कोल्हुआ येथील अशोकस्तंभ परिसरात पर्यटकांची गर्दी उसळू लागली आहे. काेराेनामुळे गेल्या तीन वर्षांपासून येथे येणाऱ्या परदेशातील बाैद्ध भाविकांची संख्या घटली होती. यंदा दक्षिण कोरियाहून १,२५० बौद्ध भाविकांचा चमू शुक्रवारी काेल्हुआ येथे दाखल झाला. येथे भगवान बुद्धांच्या उपदेशस्थळी दक्षिण कोरियाचे बौद्ध धर्मगुरू भंते पोमन्यून सुनिम यांच्या नेतृत्वात वैश्विक शांततेची कामना करत पठण झाले. पात्रात मध घेऊन मंत्रोच्चारण करताना मनोती स्तुपाची परिक्रमा केली तसेच वैश्विक शांततेची कामना केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.