आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जम्मू-काश्मीरमध्ये 149 वर्षे जुन्या ‘दरबार मूव्ह’च्या परंपरेचा अस्त; सरकार खुश, पण जम्मूचे व्यावसायिक झालेत नाराज

जम्मू / माेहित कंधारी13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 10 हजार कर्मचारी 6 महिन्यांसाठी जम्मूला येत होते, त्यामुळे बाजारांत असायची वर्दळ

जम्मू-काश्मीरमध्ये १४९ वर्षे जुन्या ‘दरबार मूव्ह’ परंपरेचा अस्त झाल्याने जम्मूचे व्यावसायिक खूप नाराज आहेत, तर जम्मूला दुसरे घर बनवणारे काश्मिरी कर्मचारीही निराश आहेत. प्रशासनाने तीन डझनपेक्षा जास्त विभागांच्या कार्यालयांच्या कागदपत्रांचेे डिजिटायझेशन पूर्ण झाल्यानंतर जून २०२१ मध्ये ‘दरबार मूव्ह’साठी कर्मचाऱ्यांच्या नावे दिलेल्या घरांचे वाटप रद्द केले होते.

वर्षात दोनदा होणाऱ्या ‘दरबार मूव्ह’मुळे १० हजार कर्मचाऱ्यांना घर बदलावे लागत असे. त्यासाठी त्यांना २५ हजारांचा भत्ता दिला जात असे. ‘दरबार मूव्ह’नंतर सचिवालय, राजभवन, पोलिस मुख्यालय, सरकारी विभाग, सार्वजनिक उपक्रम, मंडळे आणि हायकोर्टाची मुख्य विंग आदी उन्हाळ्यात श्रीनगरला तर हिवाळ्यात जम्मूला स्थलांतरित केले जात होते. ही परंपरा १९ व्या शतकापासून सुरू होती. जम्मूच्या रघुनाथ बाजार व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष सुरिंदर महाजन यांनी सांगितले,‘जेव्हा दरबार हिवाळ्यात जम्मूला जात होता, तेव्हा काश्मीरचे हजारो कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय जम्मूला जात होते. जम्मूच्या बाजारात सहा महिने विक्री वाढत होती, पण आता हे चित्र दिसणार नाही.’ महाजन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराज्यपालांना ‘दरबार मूव्ह’ बंद करण्याच्या निर्णयावर फेरविचार करण्याचे आवाहन केले.

नरवालच्या किरयानी तलाव भागातील दूध विक्रेते आलमदीन गेल्या वर्षी येथे राहणाऱ्या खोऱ्यातील एक डझन कुटुंबांना दूध देत होते. शास्त्रीनगरातील माणिक गुप्ता हे घराचा एक भाग काश्मीरच्या एका कर्मचाऱ्याला सहा महिन्यांसाठी भाड्याने देत होते, पण यंदा ते होणार नाही. जम्मूतील कापड व्यापारी तिलक राज म्हणाले,‘काश्मिरी कर्मचारी कुटुंबासह फिरण्यासाठी येत असत. त्यामुळे ६ महिने अतिरिक्त उत्पन्न होत होते. आता ते होणार नाही.’

सरकारचा दावा- यामुळे २०० कोटी रुपये वाचतील
प्रशासनाचा दावा आहे की, ‘दरबार मूव्ह’ बंद केल्याने सरकारी तिजोरीत वार्षिक १५०-२०० कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत होईल. दरवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सचिवालयाकडे जाणाऱ्या जम्मूच्या रस्त्यांची दुरुस्ती केली जात होती. खराब ट्रॅफिक सिग्नलही दुरुस्त केले जात होते. शेकडो कार्यालयांचे परिसर सजवले जात होते. आता हे होणार नाही.

बातम्या आणखी आहेत...