आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या हस्ते केंद्र-राज्य विज्ञान परिषदेचे उद्घाटन:नावीन्य आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हा उद्देश

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्र-राज्य विज्ञान परिषदेचे उद्घाटन करतील. अहमदाबादच्या सायन्स सिटीमध्ये हा कार्यक्रम 2 दिवस चालणार आहे. याबाबतची माहिती पीएमओने दिली आहे. हा कार्यक्रम देशातील नवकल्पना आणि उद्योजकता सुलभ करण्याच्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगण्यात आले.

देशभरातील 100 स्टार्टअपचे सीईओही येणार
या कॉन्क्लेव्हमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे सचिव, उद्योग क्षेत्रातील दिग्गज, उद्योजक, स्वयंसेवी संस्था, वैज्ञानिक आणि विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. तसेच, या परिषदेत देशभरातील 100 हून अधिक स्टार्टअपचे सीईओ सहभागी होऊ शकतात.

नावीन्यपूर्णतेला चालना देणे
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, या परिषदेचा उद्देश केंद्र आणि राज्यांमध्ये समन्वय निर्माण करणे हा आहे. जेणेकरून देशात विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पना यांची एक मजबूत इको-सिस्टम तयार होईल. या परिषदेत STI व्हिजन 2047 सह इतर अनेक विषयांवर सत्रे होणार आहेत.

2030 पर्यंत संशोधन आणि विकासामध्ये खाजगी क्षेत्रातील गुंतवणूक दुप्पट करण्याचे या परिषदेचे उद्दिष्ट आहे. तसेच शेती आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी नवनवीन शोध घेण्यासाठी तांत्रिक हस्तक्षेप. त्यामुळे रोजगार निर्माण होऊन लोकांना मूलभूत सुविधा मिळतील, ज्या देशाच्या विकासासाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक आहेत.

बातम्या आणखी आहेत...