आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
५१ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) पडदा शनिवारी उघडणार आहे. या वर्षी बांगलादेशची निवड कंट्री फोकस म्हणून करण्यात आली असून या विभागांतर्गत चार बांगलादेशी चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यात तन्वीर मोकामेल यांचा “जिबोनधुली’, जहीदूर रहीम यांचा “मेघमल्लार’, अकरा दिग्दर्शकांनी एकत्र येऊन तयार केलेला “सिन्सियरली युअर्स’ आणि रुबायत हुसेन यांचा “अंडर कन्स्ट्रक्शन’ या चित्रपटांचा समावेश आहे. गेल्या वर्षी फोकस कंट्रीचा मान रशियाला मिळाला होता. मास्टरक्लासमध्ये शेखर कपूर, प्रियदर्शन, सुभाष घई, पेरी लँग, तन्वीर मॉकमेल यांची सत्रे होणार आहेत.
इन कॉन्व्हर्सेशन मध्ये 16 मान्यवर होणार सहभागी
इन कॉन्व्हर्सेशनमध्ये विकी केज, राहुल रवैल, मधुर भंडारकर, पाबलो सिसर, अबू बक्र, प्रसून जोशी, जॉन मॅथ्यू मथ्थन, अंजली मेमन, आदित्य धर, प्रसन्न विथांगे, हरिहरन, विक्रम घोष, अनुपमा चोप्रा, सुनील दोषी, डॉमनिक संगमा, सुनील टंडन हे सहभागी होतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.