आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हे आहेत भारत बायोटेक कंपनीचे चेअरमन व एमडी डॉ. कृष्णा ऐल्ला. हैदराबादच्या जिनोम व्हॅलीतील ही कंपनी ‘कोव्हॅक्सिन’ तयार करतेय. ६५ वर्षीय डॉ. ऐल्ला रोज लॅबमध्ये १६ तास घालवतात. त्यांची पत्नी सुचित्रा जाॅइंट एमडी आहे, सध्या त्या वैज्ञानिकांच्या जेवणापासून राहण्याची सोय बघत आहेत. क्लिनिकल ट्रायलदरम्यान डॉ. ऐल्लांनी प्रथमच मीडियाशी संवाद साधला आहे.
यूएसमध्ये स्थायिक झाल्यानंतर आईने परत बोलावले; म्हणाल्या, कितीही कमावले तरी पोट ९ इंचांचेच, त्याहून जास्त खाता येणार नाही
‘कोव्हॅक्सिन’बाबत कधी विचार केला?
जानेवारीत चीनने कोरोना लस निर्मिती सुरू केली होती. मार्च-एप्रिलमध्ये यूएस, रशियाने सुरुवात केली. तेव्हा भारताने आपली लस तयार करावी, असे वाटले. हा आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. महामारीत कुणी कुणाच्या सोबत नसते. मी त्वरित आयसीएमआरशी बोललो व लसीचे काम सुरू केले.
टीममध्ये किती लोक आहेत?
अाधी २०० लोक निवडले. लॅबमध्ये राहणाऱ्या २० वैज्ञानिकांचे वय ३५ व त्यापेक्षा कमी होते. हे लोक ५ महिने घरी जाऊ शकत नाहीत. यामुळे आधी कुटुंबाची परवानगी आणा, असे मी त्यांना सांगितले.
लसनिर्मितीत सर्वात मोठे चॅलेंज?
मीडिया! अनेकदा भ्रामक बातम्या दाखवल्या जातात. यामुळे चाचण्यांवर परिणाम होतो. टेस्टविना नवा शोधही लागत नाही.
किती डोस घ्यावे लागतील, किंमत?
२ डोस घ्यावे लागतील. पहिल्या डोसच्या २८ दिवसांनी दुसरा. किमतीबाबत सांगणे घाईचे ठरेल. प्रारंभी लस महाग असू शकते मागणी वाढल्यानंतर दर घटतील.
लस कधी लाँच करू शकता?
२६ हजार स्वयंसेवकांवर फेज-३ मध्ये चाचणी होईल. १३ हजारांची भरती झाली. निकाल फेब्रुवारीत येतील. लस बाजारात कधी येईल, हे सरकार ठरवेल. सरकारने आज परवानगी दिली तर आम्ही लस उपलब्ध करून देऊ.
आपण शेतकरीपुत्र, फार्मात कसे?
कुटुंब शेतकरी होते. मीही कृषीत पदवी घेतली. फेलोशिपनंतर यूएसला गेलो. तेथे पीजी व पीएचडी केले. तेथेच स्थायिक होणार होतो. मात्र आई-पत्नीने भारतात परतण्याची मागणी केली. आई म्हणाली, तू कितीही कमावले तरी पोट ९ इंचांचेच असते. यापेक्षा जास्त खाता येत नाही... अन् मी भारतात परतलो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.