आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबानी राजवट:हवाई दलाचे विमान काबूलहून 168 लोकांना घेऊन हिंडन एअरबेसवर पोहोचले; यापूर्वी एअर इंडियाच्या विमानाने 87 लोक आले होते

काबूल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधून 168 लोकांना घेऊन निघालेले हवाई दलाचे विमान गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर पोहोचले आहे. यामध्ये 107 भारतीय आहेत. यामध्ये भारतीय वंशाचे अफगाणी खासदार नरेंद्र सिंह खालसा, अनारकली होनयार आणि त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. तालिबान्यांनी शनिवारी काबूल विमानतळावरून ज्यांना पळवून नेले त्यांच्यामध्ये होनयार आणि खालसा यांचा समावेश होता. तालिबानने म्हटले होते की ते अफगाणी आहेत, त्यामुळे ते देश सोडू शकत नाहीत. मात्र नंतर त्यांना सोडून देण्यात आले. भारतात पोहोचल्यावर नरेंद्र सिंह खालसा भावूक झाले.

यासोबतच काबूलमधून बाहेर काढलेले 87 भारतीय आज सकाळी दिल्लीला पोहोचले आहेत. यामध्ये 2 नेपाळींचा समावेश आहे. मायदेशी परतल्याच्या आनंदात भारतीयांनी विमानातच भारतमातेचा जयघोष केला. हे लोक 2 विमानांनी भारतात पोहोचले आहेत. त्यांना यापूर्वी ताजिकिस्तानची राजधानी दुशांबे आणि कतारची राजधानी दोहा येथे पाठवण्यात आले होते. तेथून काल रात्री त्यांना भारतात पाठवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...