आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Action Of 'income Tax' On Dainik Bhaskar Group Continues On The Fourth Day; News And Live Updates

भास्कर IT रेड:दैनिक भास्कर समूहावरील ‘आयकर’ची कारवाई चौथ्या दिवशीही सुरूच

भोपाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • असहमतीनंतरही प्राप्तिकर विभागाच्या निवेदनातील प्रमुख अंश

केंद्राच्या आयकर विभागाकडून दैनिक भास्कर समूहावरील कारवाई रविवारी चौथ्या दिवशीही सुरू होती. सात राज्यांतील दैनिक भास्कर समूहाची कार्यालये व 20 निवासी परिसरात केंद्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम दस्तऐवज तपासत होते. दैनिक भास्कर समूहाचे व्यवस्थापन पथकाला पूर्ण सहकार्य करत आहे. प्रत्येक विषयावरील तथ्यात्मक स्थिती स्पष्ट होईल असे सर्व दस्तऐवज उपलब्ध करून दिले जात आहेत.

केंद्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दैनिक भास्कर समूहाच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, नवी दिल्ली आणि यूपीतील नोएडा येथील कार्यालये आणि निवासी परिसरात 22 जुलै रोजी तपासणी सुरू केली होती.

निष्पक्ष पत्रकारितेचा धर्म : असहमतीनंतरही प्राप्तिकर विभागाच्या निवेदनातील प्रमुख अंश
प्राप्तिकर विभागाच्या दाव्यांशी असहमतीनंतरही भास्कर समूह त्यांच्या निवेदनाचे प्रमुख अंश प्रकाशित करत आहे. प्राप्तिकर विभागाने शनिवारी रात्री निवेदन जारी करून दावा केला की, समूहात 6 वर्षांत 700 कोटींच्या उत्पन्नावरील करांबाबत अनियमितता दिसली आहे. त्याची चौकशी केली जात आहे. तसेच विविध कंपन्यांत सायक्लिकल ट्रेड, फंड ट्रान्सफर व रिअल इस्टेट कंपनीत कर्जाबाबतही चौकशी सुरू आहे.

प्राप्तिकर विभागाने निवेदनात म्हटले आहे की, कंपनीच्या उत्पन्न-खर्चाबाबत तपासणी सुरू आहे. विविध व्यवहार आणि टॅक्स पेमेंटची कागदपत्रे तपासली जात आहेत. या सर्व मुद्द्यांवर भास्कर व्यवस्थापनाने म्हटले आहे की, विभागाने ज्या अनियमितता सांगितल्या, त्यात कोणत्याही प्रकारचा घोळ नाही. या सर्व मुद्द्यांवर त्यांना संपूर्ण तथ्यात्मक माहिती आणि दस्तऐवज उपलब्ध केले जात आहेत. जेणेकरून स्थिती स्पष्ट होऊ शकेल. दुसरीकडे, विभागाने सांगितले की, लखनऊस्थित आणखी एका समूहाची चौकशी पूर्ण झाली आहे. तेथील कागदपत्रांत उत्पन्न व करांत अनियमितता आढळल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...