आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअग्निपथ योजनेला विरोध होत असताना, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि लष्कराने मंगळवारी पुन्हा एकदा या योजनेची गुणवत्ता समजावून सांगितली. डोभाल म्हणाले, अग्निपथ योजनेची मागणी २२ ते २५ वर्षांपासून प्रलंबित होती. भविष्यातील गरजा लक्षात घेऊन काही निर्णय घ्यावे लागतात. लष्करी प्रशिक्षणामुळे समाजात अग्निवीरांचा सन्मान वाढेल. देशभरातील वातावरण झपाट्याने बदलत आहे आणि देशाची व लष्कराची सुरक्षा जागतिक दर्जाची बनवण्यास आमचे प्राधान्य आहे. डोभाल म्हणाले, अग्निवीर म्हणजे कधीही संपूर्ण सैन्य नसेल. जे अग्निवीर कायम होतील.
सरकार सुप्रीम कोर्टात-म्हणणे ऐकून घेण्याची विनंती
अग्निपथ योजनेला स्थगिती देण्यासाठी सुप्रीम कोर्टात आणखी एक याचिका दाखल झाली. अशा तीन याचिका दाखल आहेत. केंद्र सरकारने या याचिकांवर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपली बाजू ऐकून घेण्यासाठी कॅव्हेट दाखल केले. याचिकाकर्ता विशाल तिवारी यांनी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. यावर कोर्ट म्हणाले की, यावर सरन्यायाधीशच निर्णय घेतील. मालमत्तेच्या नुकसानीची विशेष समितीद्वारे चौकशी करण्याची मागणी तिवारी यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.