आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Ambulance Was Set On Fire By An Angry Mob After The Death Of A Corona Patient In Belgaon

बेळगाव:बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात संतप्त जमावाने रुग्णवाहिका पेटवली; रुग्णांच्या उपचाराकडे दुर्लक्ष केल्याने जमावाने कृत्य

बेळगाव3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • रुग्णालयाबाहेरील वाहनांवर देखील केली दगडफेक, पोलिस आणि आरोग्य खात्याच्या वाहनांचे नुकसान

बेळगावच्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना विभागात रुग्णाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर संतप्त जमावाने रुग्णवाहिका पेटवून दिली. त्यानंतर रुग्णालयाबाहेर उभ्या असलेल्या खासगी वाहनांवरही दुकान दगडफेक करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त के. त्यागराजन तसेच जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे. रुग्णांच्या वाढलेल्या संख्येमुळे बेडची कमतरता भासत आहे. यातूनच रुग्णांवर उपचार करण्यास काहीसा अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात डॉक्टर कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांचे वारंवार वाद होत आहेत. शहरातील एका रुग्णावर कोरोना विभागात उपचार सुरू होते. सदर रुग्णाचा काल बुधवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर संतप्त जमावाने जिल्हा रुग्णालय समोर थांबलेल्या रुग्णवाहिकेला पेटवून दिले. त्यानंतर जमावाने रुग्णालयाबाहेर खाजगी वाहनांवरही दगडफेक केली. यामध्ये पोलिस आणि आरोग्य खात्याच्या वाहनांवरही दगडफेक झाली आहे.

संतप्त जमावाने रुग्णालयातील काही जणांना मारहाण केली. या सर्व गोंधळानंतर रुग्णालयात एकच कोलाहल माजला. रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हाधिकारी हिरेमठ व पोलीस आयुक्त त्यागराजन यांनीही घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. दरम्यान उशिरा मिळालेल्या माहितीनुसार सदर प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आल्याचे कळते.