आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंसाचाराचे CCTV फुटेज उजेडात:कानपुरातील संतप्त जमावाने दुकान लुटले, अश्रूधुरातही करत होते दगडफेक

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूरच्या बेकनगंज भागात झालेल्या हिंसाचाराचे एक नवे सीसीटीव्ही फुटेज उजेडात आले आहे. 5 मिनिट 39 सेकंदांच्या या व्हिडिओत संतप्त जमाव दगडफेक करताना दिसून येत आहे. पोलिस या व्हिडिओच्या मदतीने संशयितांची धरपकड करत आहेत. पोलिस आयुक्त विजय मीणा यांनीही आरोपींना लवकरच बेड्या ठोकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

5 मिनिट 39 सेकंदांचा व्हिडिओ

व्हिडिओच्या प्रारंभीच्या 15 सेकंदांत जमाव चौकात गोळा होताना दिसून येतो. त्यातील 2 मुले हातात दगड घेऊन फेकतात. त्यानंतर मागे जाऊन लपतात. त्यानंतर आणखी काही मुले दगड घेऊन दुसऱ्या पक्षाला फेकून मारतात. रस्त्यावर पूर्वीपासूनच काही दगड पडले होते.

पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. पण, त्यानंतरही जमाव पांगण्याऐवजी वाढला. ज्या ठिकाणी अश्रूधुराच्या नळकांड्या येऊन पडत होत्या, तेथून 5 मीटर अंतरावरुन मुले पोलिसांवर दगड भिरकावत होते.

जमाव चौकात जमला व दगडफेक सुरू झाली.
जमाव चौकात जमला व दगडफेक सुरू झाली.

जमावाने पानाचे दुकान लुटले

या दगडफेकीनंतर स्थानिकांनी आपापली दुकाने बंद केली. पण, जमावाने रस्त्याशेजारच्या पानाच्या एका दुकानाची प्रचंड मोडतोड केली. यामुळे दुकानदार भीतीने पळून गेला. जमावाने दुकानातील साहित्यही रस्त्यावर फेकून दिले. तर काहींनी आपले खिसे भरले.

उपद्रवींची संख्या 100 वर पोहोचल्यानतंर दगडफेक सुरू

पाहता पाहता दंगेखोरांचा आकडा 100 वर पोहोचला. यामुळे पोलिसांना मागे हटावे लागले. जमावाने बंद दुकानांच्या शटरवरही दगडफेक केली. तर काहींनी घरांच्या दिशेने दगड भिरकावले.

व्हिडिओच्या आधारावर होणार कारवाई

कानपूरचे पोलिस आयुक्त विजय सिंह मीणा यांनी दंगेधोरांवर धार्मिक उन्माद पसरवणे, प्राणघातक हल्ला करणे, हिंसाचार पसरवणे आदी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले. दंगेखोरांची ओळख पटविण्यासाठी व्हायरल व्हिडिओ व सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली जात आहे.

डीसीपी (गुन्हे) सलमान ताज पाटील, पोलिस आयुक्त विजय सिंह मीणा व एसीपी आनंद प्रकाश तिवारी यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला.
डीसीपी (गुन्हे) सलमान ताज पाटील, पोलिस आयुक्त विजय सिंह मीणा व एसीपी आनंद प्रकाश तिवारी यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला.

हिंसाचाराला सुरूवात

3 जून रोजी सकाळपासूनच बेकनगंजमध्ये असामान्य शांतता होती. येथील मुस्लिम समुदायाची बहुतांश दुकानेही बंद होती. पण, हिंदू दुकानदारांनी नेहमीप्रमाणे आपला व्यवसाय सुरू ठेवला होता. दुपारी 1.45 वा. यतीमखान्यालगतच्या मशिदीत शुक्रवारचा नमाज झाला. त्यानंतर 2.30 च्या सुमारास मशिदीतून बाहेर पडलेल्या लोकांनी थेट बाजारपेठेत जावून हिंदूंना दुकाने बंद करण्याची जबरदस्ती केली. त्याला हिंदूंनी विरोध केला असता काही असामाजिक तत्वांनी अचानक दगडफेक सुरू केली. त्यानंतर संपूर्ण वातावरण बिघडले. यावेळी काही तत्वांनी अचानक गोळीबारही केला. त्यामुळे काही वेळातच शहरात तणाव निर्माण झाला.

बातम्या आणखी आहेत...