आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Appearance Of Ayodhya Changed, The Akhade ashram Began To Be Adorned; The Melody Of Chanting Started Reverberating Through The Temples!

अयोध्येत नवे युग:अयोध्येचे रंगरूप बदलले, आखाडे-आश्रम सजू लागले; मंदिरांतून संकीर्तनाचे सूर घुमू लागले!

त्रिभुवन | अयोध्याएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
रामजन्मभूमीला जाणाऱ्या मार्गावर प्रवेशद्वार लावले जात आहे. - Divya Marathi
रामजन्मभूमीला जाणाऱ्या मार्गावर प्रवेशद्वार लावले जात आहे.
  • जर्मन मंडप तयार, पंतप्रधान या पूजेचे मुख्य यजमान

भूमिपूजनासाठी अयोध्या सज्ज झाली आहे. रामनगरीचे रुपडे पालटले आहे. आखाडे-आश्रम सजू लागले आहेत. सुरक्षा वाढली. भूमिपूजनानंतर प्रसाद वितरणासाठी रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास आश्रमात लाडूदेखील उपलब्ध करून दिले जातील.

हनुमानगढीपासून राम जन्मभूमीकडे जाणारे मार्ग व त्याचे किनारे पिवळ्या रंगाने सजले आहेत. राम की पौडी रंगीबेरंगी रोषणाईने उजळून निघाली आहे. नंदीग्राम येथील रामजानकी मंदिरावर संकीर्तनाचे सूर घुमू लागले आहेत. मणिलालजी यांच्या छावणीत देशभरातून आलेली भेट स्वीकारली जात आहे. शनिवारी आमदार अजयसिंह यांनी ३०० ग्रॅम चांदीच्या ५० विटांचे दान केले.

अयोध्येत धार्मिकतेसह पहिले स्वातंत्र्य योद्धा मंगल पांडे व अश्फाकउल्ला खान यांच्या बलिदानाचा रंगही मिसळलेला आहे. मंगल पांडे व अश्फाकउल्ला मूळचे येथील होती. आधी दोघांना फाशी झाली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांच्या नातेवाइकांना तोफेसमोर बांधून उडवून दिले होते. लेखक यतीशचंद्र मिश्र यांच्या मते बलिदानाचे हे रंग शहराच्या वर्तमानाला नवा आकार आणि वैभव देणारे ठरतात. अयोध्या हे कधी नवाबकालीन शासन व्यवस्थेचे प्रवेशद्वार होते, हे या नगरीत फिरत असताना मुळीच वाटत नाही. अयोध्या-फैजाबादचे नवे भवितव्य कुल्हडमधून चहाचे घोट घेणारे आरिफ, परवेज व धीरज यादव यांना मात्र परिस्थिती आता बदलेल असे वाटते. परंतु फैजाबादहून अयोध्येत मंदिर परिसरात मोहल्ला कोटियापर्यंत येताच स्वप्न पाहणारे हे तरुण एकदम शांत होतात. एका तरुणाला थांबून त्याच्याशी संवाद साधला. तो शिलाईच कामे करतो. परंतु पत्रकाराशी बोलायचे नाही, असे तो सांगतो. मात्र मंदिर साकारल्यावर व्यवसाय वाढेल आणि त्यातून त्यांचे भलेही होईल, असे एका तरुणाला वाटते. त्याने आपले नाव सांगणे टाळले. वारंवार विचारल्यावर ‘नावात काय आहे? नाव सांगितल्यावर माझ्या मतावर कोणी आनंद होईल तर कोणी नाराजही होऊ शकतो. नाव तर आता रामाचे आहे. ’अयोध्येचे राजा बिलंदर मोहन प्रताप मिश्र अयोध्येच्या वैभवाला भविष्यातील व्हेटिकनसारखे पाहू लागतात. येथील सामान्य नागरिक रोमांचित आहे. एक दीर्घकालीन वाद संपुष्टात आला, असे त्यास वाटू लागले आहे. राम मंदिराजवळील अशरफ भवनच्या मागे व एसी काम करणारे आझमी भाई म्हणाले, जे काही होत आहे. ते योग्य होत आहे. आता लहान भाऊ मोठ्या भावाकडे अपेक्षेने पाहत आहे. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान येतील. तेव्हा ते निराश करणार नाहीत. अयोध्या हिंदूंची धार्मिक नगरी तर आहेच, त्याचबरोबर ह येथे वली-दर्गा आहेत.

जर्मन मंडप तयार, पंतप्रधान या पूजेचे मुख्य यजमान

श्रीरामजन्मभूमी परिसरात भूमिपूजन समारंभासाठी विशाल जर्मन हँगर तयार झाले आहे. वादळ आणि पावसापासून ते संरक्षण करू शकेल. या मंडपात पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहुण्यांसोबत बसतील. मंडपात एक व्यासपीठ तयार केलेे जात आहे. भूमिपूजनासाठी त्यांचे स्वतंत्र आसन असेल. जन्मभूमी स्थळावरील गर्भगृहाच्या ठिकाणी हे आसन असेल. तेथेच ११ पुजाऱ्यांसह आचार्य मंडळींची उपस्थिती राहील. पंतप्रधान या पूजेचे मुख्य यजमान असतील. याप्रसंगी ते मंचावरून संवाद साधतील. हा समारंभ संस्मरणीय ठरावा यासाठी सजावट, ध्वनी-प्रकाश, सुरक्षेच्या पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. हा कार्यक्रम प्रसारमाध्यमांतून थेट प्रसारित होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रविवारी दुसऱ्यांदा तयारीचा आढावा घेणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...