आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Appointment Process Of Persons With Disabilities In Civil Services Should Be Investigated

सुप्रीम काेर्ट चे निर्देश:नागरी सेवांमधील दिव्यांगांच्या नियुक्ती प्रक्रियेची चौकशी करावी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागरी सेवेत विविध श्रेणीत दिव्यांगांची नियुक्ती केली जाते. कोणत्या प्रकारच्या दिव्यांगाची नियुक्ती होते, याचा चौकशी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला दिले आहेत. न्यायमूर्ती एस.ए. नजीर व न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या पीठाने हे निर्देश दिले.

दिव्यांगांसाठी सहानुभूती हा एक पैलू आहे. परंतु त्याच्या व्यावहारिकतेची पडताळणीही केली पाहिजे. चेन्नईत शंभर टक्के दृष्टिहीन व्यक्तीची दिवाणी न्यायाधीश म्हणून कनिष्ठ विभागांतर्गत नियुक्ती करण्यात आली आहे. नंतर या व्यक्तीने तामिळ वृत्तपत्राचा संपादक म्हणूनही काम केले. त्यावर सुप्रीम कोर्टाने नियुक्ती प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेश दिले. ही प्रक्रिया सर्व श्रेणींसाठी उपयुक्त ठरत नाही. सहानुभूतीला बाजूला ठेवून आपण विचार केला पाहिजे. अॅटर्नी जनरल आर. वेंकटरमणी कोर्टाला म्हणाले, सरकारने या प्रकरणात काही अवधी मागून घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...