आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मान्सून:महाराष्ट्रात 5 ते 7 दिवस उशिराने होणार मोसमी पावसाचे आगमन, आयएमडीचा अंदाज 

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मान्सून 4 दिवस उशिराने, 5 जूनला केरळात दाखल होण्याची शक्यता

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनाचा अंदाज शुक्रवारी जाहीर केला. त्यानुसार, केरळच्या किनाऱ्यावर यंदा मान्सून सर्वसाधारण वेळेच्या ४ दिवस उशिरा ५ जूनला दाखल होण्याची शक्यता आहे. यात चार दिवस मागे-पुढे होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मान्सून वेळेवर दाखल होईल असे सांगितले जात होते. भारतीय उपखंडात दक्षिण अंदमान समुद्रात पूर्वमोसमी पावसाला सुरुवात झाली आहे. मोसमी वारे आता वायव्य बंगालच्या उपसागराकडे सरकत आहेत. 

मान्सूनच्या सुधारित वेळापत्रकानुसार, अंदमान समुद्रात नैऋत्य मोसमी वारे २२ मेपर्यंत धडकू शकते. मागील काही वर्षांच्या निरीक्षणानुसार अंदमान समुद्रावर मान्सून सक्रियतेचा आणि केरळात मान्सून दाखल होण्यात फारसा संंबंध नाही. मागील वर्षी नैऋत्य मोसमी वारे ६ जूनला केरळात दाखल होतील असा अंदाज होता, मात्र प्रत्यक्षात ८ जूनला तेथे मान्सूनचे आगमन झाले होते. सर्वसाधारणपणे १५ जुलैपर्यंत मान्सून पूर्ण देश व्यापतो. मात्र गतवर्षी १९ जुलैला मान्सून देशभर पोहोचला होता.

१६ वर्षांनंतर मे महिना इतका थंड 

हवामान विभागानुसार १६ वर्षांनंतर प्रथमच मे इतका थंड राहील. यापूर्वी २००४ मध्ये दुसऱ्या आठवड्यातील पावसाने मे महिन्यात पारा घसरला होता. पश्चिमी विक्षोभामुळे यंदा हवामानात बदल दिसून येत आहेत.

मान्सूनचे नवे वेळापत्रक : राज्यात उशिरा होणार आगमन 

मागील ३७ वर्षांच्या हवामानविषयक आकडेवारीच्या विश्लेषणावरून मध्य भारतात मान्सून ७-८ दिवस उशिराने येत आहे. राज्यात मान्सूनचे आगमन व प्रस्थानाच्या नव्या तारखा अशा - 

बातम्या आणखी आहेत...