आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मान्सूनचे आगमन:यंदा मान्सूनचे आगमन वेळेआधीच, १६ मे रोजी अंफन चक्रीवादळाची शक्यता

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्र, मध्य प्रदेशात मान्सून ३ ते ७ दिवस उशिराने

यंदा नैऋत्य माेसमी पाऊस वेळेआधी देशात दाखल होण्याची शक्यता बुधवारी भारतीय हवामान विभागाने वर्तवली. हवामान विभागानुसार बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्रात बुधवारी सकाळी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. मान्सून १५ मे रोजी बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागातून श्रीलंकेत दाखल होईल. १६ मेच्या सायंकाळपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र अंफन या चक्रीवादळात रूपांतरित होऊन नैऋत्य बंगालच्या उपसागरात येईल. हे चक्रीवादळ मान्सूनच्या प्रगतीसाठी मदत करेल, अशी माहिती हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी दिली. यंदा मान्सून सरासरीइतका राहण्याची शक्यता आहे.

हवामान विभागानुसार, अंदमान-निकोबार बेटांवर १५ आणि १६ मे रोजी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. याच काळात प्रतितास ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. १७ मे रोजी वाऱ्याचा वेग प्रतितास ८५ किमीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमडीएमए) हवामान विभागाच्या हवाल्याने टि्वट करून चक्रीवादळाचा इशारा दिला आहे.

> गतवर्षी राज्यात १४ दिवस उशिरा आगमन

> मागील वर्षी जूनमध्ये देशात सरासरीपेक्षा ३३ टक्के कमी पाऊस झाला होता.

> मागील दहा वर्षांत २०१३ मध्ये मान्सून १६ जूनलाच संपूर्ण देशात पोहोचला होता.

> मागील वर्षी केरळात ७, तर मुंबईत १४ दिवस उशिराने मान्सून आला होता.

महाराष्ट्र, मध्य प्रदेशात मान्सून ३ ते ७ दिवस उशिराने

हवामान विभागानुसार, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगण, आंध्र प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशसह काही भागात मान्सून यंदा ३ ते ७ दिवस उशिराने दाखल होईल.

बातम्या आणखी आहेत...