आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:औरंगाबादच्या महिलेची पाकिस्तानी तुरुंगातून 18 वर्षांनंतर झाली सुटका, 2002 मध्ये गेली होती लाहोरला

अमृतसर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानातील लाहोर तुरुंगात १८ वर्षे राहिलेल्या औरंगाबादच्या हसीना दिलशाद अहमद (६५) यांची नुकतीच सुटका झाली. त्या आता अमृतसर येथील गुरू नानकदेव रुग्णालयाच्या धर्मशाळेत मुक्कामाला आहेत. त्यांची प्रकृती समाधानकारक असून त्यांचे नातेवाईक लवकरच त्यांना घरी घेऊन जाणार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसीना यांचा विवाह उत्तर प्रदेशातील सहारनपूर नबाब का किला येथील दिलशाद अहमद यांच्याशी झाला होता. २००२ मध्ये त्या दूरच्या काही नातेवाइकांना भेटण्यासाठी लाहोरला गेल्या. पण त्यांना नातेवाईक भेटलेच नाहीत.

त्या लाहोर शहरातच भटकत राहिल्या. दरम्यान, त्यांचा पासपोर्ट हरवला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना संशयित घोषित करून तुरुंगात टाकले. हसीना यांचे भाचे जैनुद्दीन यांनी सांगितले की, माझी मावशी म्हणजे हसीना बेगम यांचा विवाह सहारनपूर येथील दिलशाद यांच्याशी झाला होता. १८ वर्षानंतर त्यांचा शोध लागल्याचा आनंद आहे. आम्ही लवकरच त्यांना घरी आणणार आहोत. अमृतसरचे जिल्हाधिकारी गुरुप्रीतसिंह खैहरा यांचे सचिव सुभाष यांनी हसीना यांच्या नातेवाईकांना पूर्ण मदत केली जाईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, हसीना यांनी पोलिसांना असे सांगितले आहे की, त्यांना दोन मुले असून दोघेही त्यांना घरी नेण्यासाठी येणार आहेत

कोरोनाकाळात सुटका
कोरोनाकाळात त्यांची सुटका करण्यात आली आणि २० डिसेंबर रोजी त्या थेट अमृतसरमध्ये दाखल झाल्या. अमृतसरच्या पोलिसांनी हसीना यांच्याकडून माहिती घेत त्यांचे भाचे जैनुद्दीन चिश्ती यांच्याशी संपर्क साधला.

बातम्या आणखी आहेत...