आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Bail Of Tista Setalwad, Who Is Arrested In Gujarat Riots Case, Has Been Cleared

सुनावणी:गुजरात दंगलीप्रकरणी अटकेत असलेल्या तिस्ता सेटलवाड यांच्या जामिनाचा मार्ग माेकळा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात दंगलीप्रकरणी अटकेत असलेल्या तिस्ता सेटलवाड यांच्यावर यूएपीए कायद्यासारखे गंभीर आरोप नाहीत की त्यांना जामीन नाकारला जाऊ शकतो, असे सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने सांगितले. यामुळे तिस्ता यांच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मानले जाते. तिस्ता यांच्या जामिनाला गुजरात सरकारने विरोध केला आहे. सुनावणीवेळी न्यायालयाने गुजरात सरकारला चांगलेच फटकारले.

गुजरात दंगलीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीशिवाय इतर काय आरोप आहेत? दोन महिन्यांपासून त्या तुरुंगात आहेत. एखाद्या महिलेच्या याचिकेवर ६ आठवडे सुनावणी झाली नाही, असे कधी घडले आहे का, अशा शब्दांत न्यायालयाने फटकारले. याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...