आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराड्रग्ज तस्करी समाज व देशाला आणखी पोखरून टाकत आहे. त्यामुळेच आम्ही एकूण २७२ जिल्हे व सुमारे ८० हजारांहून जास्त गावांचे चिन्हांकन केले आहे. अमली पदार्थांच्या विरोधात लढाई कुठे लढायची आहे, याचे क्षेत्र आता निश्चित आहे. हे युद्ध एकटे केंद्र सरकार लढू शकत नाही. अशा युद्धात राज्यांचा वेग जास्त असतो. त्यापेक्षा जास्त वेग जिल्हापातळीवर असतो, असे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. चंदीगडमध्ये ‘नशेच्या आैषधींची तस्करी व राष्ट्रीय सुरक्षा’ यावरील राष्ट्रीय संमेलनात ते शनिवारी बोलत होते. शहा म्हणाले, ड्रग्ज दहशतवादी घटनांपेक्षा धोकादायक आहे. कारण दहशतवादी घटनांत हानी मर्यादित होते. परंतु अमली पदार्थामुळे आपल्या पिढ्यांचे नुकसान होते. पंजाबमध्ये ड्रग्जच्या बाबतीत समस्या मोठी आहे.
कारण सीमेवरील राज्य आहे. त्यासाठी या भागात नशा रोखण्यासाठी व्यापक प्रयत्न करावे लागतील. म्हणूनच आम्ही मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे जागेची मागणी केली आहे. केंद्र सरकार अमृतसरमध्येही एक मोठी फॉरेन्सिक लॅब उभारेल. त्याशिवाय एनसीबीचे लहान केंद्र पंजाबात सुरू केले जाईल, अशी घोषणाही शहा यांनी या वेळी केली. शहा यांनी आपल्या भाषणात डार्क नेट तसेच वेबसोबत क्रिप्टोकरन्सीचाही उल्लेख केला. ते म्हणाले, या दोन्ही गोष्टी परस्परांशी जोडलेल्या आहेत.
३१,००० किलोग्रॅम ड्रग्जचे दहन
अमित शहा यांच्या निगराणीखाली शनिवारी चंदीगडसह देशातील मोठ्या शहरांत ३१ हजार किलोग्रॅमहून जास्त ड्रग्जचे दहन करण्यात आले. हे ड्रग्ज गेल्या काही वर्षांत एनसीबीने छापे व इतर कारवायांत जप्त केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.