आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The BCG Vaccine, Which Will Be Given To The Elderly Between The Ages Of 60 And 95, Will Test The Usefulness Of The Treatment For Corona Virus

कोरोनापासून बचाव:60 ते 95 वयोगटामधील वृद्धांना देणार बीसीजी लस, कोरोनावरील उपचारांसाठी उपयोगिता तपासणार

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्षयरोगापासून बचाव करण्यासाठी बालकांना दिली जाते बीसीजी लस

टीबीपासून बचावासाठी बालकांना दिली जाणारी बीसीजी लस काेरोनावर किती प्रभावी आहे हे तपासून पाहण्यासाठी भारतात प्रथमच मोठ्या प्रमाणावर अध्ययन केले जाणार आहे. दिल्ली, जोधपूर, भोपाळ, मुंबई, अहमदाबाद व चेन्नईतील वयोवृद्धांना ही लस दिली जाणार आहे. कोविड-१९ आजारात ती किती प्रभावी आहे याचा निकाल येण्यासाठी वर्ष लागेल. मात्र, प्राथमिक परिणाम ६ महिन्यांत दिसून येतील.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या ४ संस्थांसह दिल्ली एम्स व मुंबईच्या जीएस वैद्यकीय महाविद्यालयात हे संशोधन होईल. यात ६० ते ९५ वर्षे वयोगटातील १,४५० वृद्धांवर चाचण्या घेतल्या जातील. यात बीसीजी लस न दिलेल्या ७२५ वृद्धांचाही समावेश असेल. मधुमेह, उच्च रक्तदाबासह इतर व्याधी असलेल्या वृद्धांवर चाचण्या होतील.

लसीनंतर कोरोना होतो का हे पाहिले जाणार

लस दिल्यानंतर किती लोकांना कोरोना झाला, किती लोकांमध्ये तो गंभीर झाला हे संशोधनात मुख्यत्वाने पाहिले जाईल. किती जण रुग्णालयात दाखल होतात, किती आयसीयूत भरती होतात आणि किती जणांचा आजार घरच्या घरीच बरा होतो हेही या संशोधनात पाहिले जाणार आहे.