आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • The Bicycle Industry Has Taken To E bikes To Take Advantage Of Expensive Petrol diesel

ग्राउंड रिपोर्ट:महाग पेट्रोल-डिझेलचा फायदा घेण्यासाठी सायकल उद्योग उतरला ई-बाइक्समध्ये

लुधियाना (वैवस्वत वेंकट)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशातील मोठे सायकल हब लुधियाना बदलाच्या उंबरठ्यावर
  • विदेशांतून सतत होणाऱ्या मागणीने निर्यातीसाठीही मदत मिळेल

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भलेही बहुतांश उद्योगांना सतावत अाहेत, मात्र लुधियानाचा सायकल उद्योग याकडे एक संधी म्हणून पाहत आहे. जगातील दुसरा मोठा सायकल उद्योग या संधीचा फायदा उचलत ई-बाइक्स (इलेक्ट्रिक सायकल) निर्मितीत गुंतला आहे. या इलेक्ट्रिक सायकल्सची देशात मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. विदेशातून त्यासाठी चांगल्या ऑर्डरही मिळत आहेत. ई-बाइक्स बॅटरीयुक्त सायकल असते. ती पॅडल मारून आणि बॅटरीनेही चालवता येऊ शकते. त्यामुळे हिचा वापर शहरापासून लांब पल्ला गाठण्यासाठी सहज केला जाऊ शकतो. जगभरात ई-बाइक्सना खूप चांगली मागणी आहे. यामुळे उद्योग निर्यातीची शक्यता तपासत आहे. काही मोठ्या कंपन्या युरोपमधून ऑर्डर घेण्यात यशस्वी होत आहेत. हीरो मोटर्स कंपनीचे सीएमडी पंकज मुंजाल म्हणाले, आम्ही या वर्षी दीड लाखाहून जास्त ई-बाइक्स बनवत आहोत. या ई-बाइक्स लुधियानाची सायकल व्हॅली आणि हीरोच्या गाझियाबाद प्रकल्पात तयार होत आहेत. उद्योगानुसार, देशात तयार होणाऱ्या ई-बाइक्समध्ये केवळ इलेक्ट्रिक भागाची आयात केली जाईल. उर्वरित ८५ टक्क्यांपेक्षा जास्त सायकलचे भाग भारतातच तयार हाेतील. नरेन इंटरनॅशनलचे एमडी राजेश कालरा म्हणाले, आम्ही या वर्षापासून ई-बाइक्स तयार करण्यास सुुरुवात करत आहोत. मागणी चांगली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने ई-बाइक्स सर्वात मोठी श्रेणी होत आहे. पुढील वर्षापासून आम्ही उत्पादन दुप्पट करू. उत्पादनाची ५० टक्के निर्यात केली जाईल.

या वर्षी आम्ही १० हजार ई-बाइक्सपासून सुरुवात करत आहोत. पुढील वर्षी कमीत कमी दुपटीपर्यंत उत्पादन वाढवू. युरोपसह अन्य देशांत निर्यात वाढल्यावर जोर दिला जाईल. आगामी काळ ई-बाइक्सचा आहे. - ओंकारसिंह पाहवा, एमडी, एवन सायकल्स

ई-बाइक्स श्रेणीत दुप्पट वाढ
आगामी काळात ई-बाइक्सची श्रेणी सर्वात वेगाने वाढणार आहे. पुढील वर्षी हीरो सायकलही ई-बाइक्स श्रेणीत दुप्पट वाढ नोंदवेल. - पंकज मुंजाल, सीएमडी, हीरो मोटर्स कंपनी

सर्वात मोठी श्रेणी होत आहे. पुढील वर्षापासून आम्ही उत्पादन दुप्पट करू. उत्पादनाची ५० टक्के निर्यात केली जाईल. आम्ही या वर्षापासून ई-बाइक्स तयार करण्यास सुुरुवात करत आहोत. मागणी चांगली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने ई-बाइक्स

उद्योगातील दिग्गजांनुसार, सरकार प्रत्येक शहरात सायकल ट्रॅकचे धोरण पूर्ण करत असेल तर आगामी काळ ई-बाइक्सचाच असेल. शहरांत अंतर जास्त असल्यामुळे सामान्य लोक सायकलऐवजी ई-सायकलला प्राधान्य देतील.

बातम्या आणखी आहेत...