आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतातील लोकसंख्या खूप जास्त आहे. यामुळे वैज्ञानिकांसाठी व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटला ट्रॅक करणे सर्वात मोठे आव्हान आहे. मात्र चांगली गोष्ट म्हणजे स्वदेशी कोव्हॅक्सीन सर्व व्हेरिएंटमध्ये फायदेशीर सिद्ध झालेली आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलचे माजी प्रोफेसर आणि अमेरिकेतील वैज्ञानिक विलियम हॅसलटिन यांनी असे म्हटले आहे.
नवीन व्हेरिएंटविषयी व्यक्त केली चिंता
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, हॅसलटिन म्हणाले की, गेल्या 14 दिवसांपासून भारतात सुमारे 3 लाखांहून अधिक संक्रमित लोक सापडले आहेत. आतापर्यंत देशातील दोन दशलक्षाहूनही अधिक लोक या साथीच्या आजाराला बळी पडले आहेत. अशा परिस्थितीत, वाढत्या घटनांमध्ये आणि लोकसंख्येच्या दृष्टीने आगामी काळात नवीन म्यूटेशन ओळखणे हे भारतीय शास्त्रज्ञांसाठी चिंताजनक ठरू शकते.
पुढे ते म्हणाले की, B.1.617 नावाने ओळखल्या जाणाऱ्या भारतीय व्हेरिएंटची कदाचित दुसरी किंवा तिसरी पीढीही पसरत आहे आणि त्यामधील काही खूप जास्त धोकादायक ठरु शकतात. भारतात आवश्यक जीनोम सिक्वेंसिंगची क्षमता आहे ही चांगली गोष्ट आहे. मात्र यासाठी मोठ्या प्रमाणात देखरेख कार्यक्रमाची आवश्यकता आहे. यासाठी जास्तीत जास्त नवीन व्हेरिएंटवर नजर ठेवावी लागेल.
नवीन व्हेरिएंटने व्हॅक्सीनेशन प्रक्रिया प्रभावित
हॅसलटिन यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसचे अनेक व्हेरिएंट पहिले जगातील अनेक भागांमध्ये व्हॅक्सीनेशन प्रक्रियेला प्रभावित करत आहेत. कारण संक्रमण झपाट्याने पसरण्याची संधी मिळत आहे. श्रीमंत देशांनी लवकरच व्हॅक्सीनेशन करुन येथे महामारी मोठ्या प्रमाणात नियंत्रित केली आहे. मात्र विकसनशील देशांमध्ये हे झपाट्याने पसरत आहे.
डबल म्यूटेंट व्हेरिएंटवर उपयुक्त आहे व्हॅक्सीन
जानकार भारतीय स्ट्रेनला डबल म्यूटेंट असल्याचे सांगत आहेत. कारण यामध्ये व्हायरसच्या जीनोममध्ये दोन बदल झाले आहेत. ज्याला E484Q आणि L452R असे म्हटले जाते. दोन्ही व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनवर परीणाम करतात, ज्याच्या सहाय्याने ते शरीरात दाखल होते.
काही संशोधकांचा अंदाज आहे की, भारतीय व्हेरिएंट यूकेच्या B.1.1.7 व्हेरिएंटप्रमाणे सुरुवातीच्या व्हायरसपेक्षा 70% जास्त संक्रामक आहे. खरेतर संशोधनात भारतीय व्हेरिएंटला जास्त धोकादायक असल्याचे सांगण्यात आलेले नाही.
भारतात दिली जाणारी कोव्हॅक्सीन आणि कोवीशील्ड या स्ट्रेनच्या विरोधात खूप प्रभावी आहे. स्पुतनिक V अशाच प्रकारे प्रभावी असल्याची अपेक्षा आहे. फायजरचे भारतीय सहयोगीही आपल्या व्हॅक्सीनविषयी अशीच अपेक्षा करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.