आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर टेरर:सर्वात मोठे हॅकिंग; दिल्ली एम्सच्या 4 कोटी रुग्णांचा डेटा चोरीस

पवनकुमार | नवी दिल्ली5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीबीआय, आयबी, डीआरडीओ, दिल्ली पोलिसांकडून तपास; आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीशी लागेबांधे शक्य

दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) ऑनलाइन सिस्टिमवर मोठा सायबर हल्ला झाल्याचे उघडकीस आले आहे. एम्सच्या सिस्टिममधून सुमारे चार कोटी रुग्णांच्या डेटाची चोरी झाली आहे. देशाच्या वैद्यकीय क्षेत्रातील हे सर्वात मोठे हॅकिंग आहे. दोन दिवसांपासून सीबीआय, अायबी, डीआरडीओ आिण दिल्ली पोलिस तपासकामी लागले आहेत.एम्सच्या दोन सिस्टिम अॅनालिस्टना निलंबित करण्यात आले. डेटा हॅकिंग आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीशी संबंधित असल्याचा संशय आहे, तर हा सायबर दहशतवादाशी संबंधित हल्ला असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

ऑनलाइन सेंट्रल सिस्टिमशी संबंधित संगणकांची तपासणी
तपास यंत्रणांकडून एम्समधील ऑनलाइन सेंट्रलाइज्ड सिस्टिमशी संबंधित सर्व संगणकांची झडती
सुुरू आहे. सायबरतज्ज्ञ सॉफ्टवेअर इंजिनिअर, डेटा हॅकचे सोर्स व रिसीव्हरचा शोध घेतला जात आहे. तसेच सायबर हल्ले रोखण्यासाठी उपाय केले जात आहेत.

इंटरनेट बंद केले
एम्समध्ये इंटरनेट बंद केले आहे. ई-हॉस्पिटल डेटाबेस आणि लॅब इन्फॉर्मेशन सिस्टम (एलआईएस) च्या डेटा बेसला एक्सटर्नल हार्ड ड्राइवमध्ये ठेवले आहे. चार अितरिक्त सर्व्हर लावण्यात आले असून ओपीडी आणि आईपीडीत सर्व कामे मॅन्युअली सुरु आहेत.

एम्स सर्व्हरमध्ये रुग्णांची माहिती
आठ वर्षांपूर्वी एम्समधील दस्तऐवज पूर्णत: डिजिटल रूपांतरित केले होते. तेव्हापासून माजी पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यासह अनेक व्हीआयपी लोकांवर उपचार झाले आहेत. त्या सर्वांचा खासगी डेटा एम्स सर्व्हरमधून चोरीस गेला अाहे.

रॅनसमवेअर हल्ला शक्य
प्राथमिक तपासानंतर रॅनसमवेअर हल्ला झाल्याचे दिल्ली पोलिस मानत आहेत. खंडणी वसुलीच्या कलमांखाली एफआयअार दाखल झाला आहे. {फार्मा कंपन्या, सर्जिकल कंपन्या व इतर मेडिकल कंपन्या या डेटाचा फायदा उचलू शकतात.

सर्ट इन रिस्पॉन्स पथकाचा समावेश

एम्सच्या डेटा हॅकिंग चौकशीत इतर तपास यंत्रणांसोबत भारतीय कॉम्प्युटर इर्मजन्सी रिस्पॉन्स पथकाचाही समावेश आहे. सर्ट इनचे पथक सायबर हॅकिंगच्या तांत्रिक बाजूची तपासणी करीत आहे. अद्यापही एम्सची सिस्टिम दुरुस्त झालेली नाही.

देशात दरमहा ३ लाख सायबर हल्ले

इंडसफेसच्या अलीकडील अहवालानुसार, भारतात दर महिन्याला वैद्यकीय क्षेत्रात सुमारे ३ लाख सायबर हल्ले होतात. हल्ल्यांची ही संख्या जगात दुसऱ्या क्रमांकाची आहे, तर अमेरिकी वैद्यकीय क्षेत्रात दरमहा ५ लाख सायबर हल्ले होतात, असे अहवालात नमूद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...