आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानात तेलाची सर्वात मोठी चोरी:650 फूट लांब हायटेक बोगदा खोदला; 2 वर्षांत कोट्यवधींचे तेल विकले

दौसा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रूड ऑयलची पाइपलाइनने चोरी झाल्याचे प्रकार नेहमीच घडतात. विशेषतः जयपूर व मथुरेत गत काही वर्षांपासून चोरीच्या अशा अनेक घटना घडल्यात. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे सरकारी तेल कंपन्यांना कोट्यवधींचा चूना लागल्यानंतरही या घटना रोखण्यासाठी कोणतेही कठोर पाऊले उचलण्यात आली नाही.

अशीच एक घटना आता राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात घडली आहे. येथे हायटेक पद्धतीने आयओसीच्या पाइपलाइनहून क्रूड ऑयल चोरी केले जात होते. चोरांच्या एका चुकीमुळे लागलेल्या आगीमुळे हा प्रकार उजेडात आला. त्यानतंर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर त्यांचेही डोके चक्रावले.

पोलिसांच्या माहितीनुसार, दौसा जिल्ह्याच्या महवा पोलिस ठाणे क्षेत्रातील धर्माकोलच्या फॅक्ट्रीच्या नावाखाली ही कच्च्या तेलाची चोरी सुरू होती. हे काम मागील जवळपास 2 वर्षांपासून सुरू होते. गोदामात आग लागल्यानंतर आयओसीच्यावतीने महुआ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

थक्क करणारी गोष्ट म्हणजे क्रूड चोरी करण्यासाठी खोदण्यात आलेला बोगद्यापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर महुआ ठाण्याची बालाहेडी चौकी आहे. पण, कुणालाही त्याची खबरबात लागली नाही. आयओसीची ही पाइपलाइन गुजरातहून मथुरेला जाते. तिथे क्रूडचे शुद्धीकरण करुन टँकर्सच्या माध्यमातून ते पेट्रोल पंपांपर्यंत पोहोचवले जाते.

कसा झाला क्रूड चोरीचा भांडाफोड

येथील थर्माकोलचा कारखाना व गोदामाच्या नावाखाली तेलाची चोरी केली जात होती. या ठिकाणी नियमितपणे टँकर्सची ये-जा सुरू होती. पण, त्यात केमिकल आणले जात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. शनिवारी सकाळी गोदामाला आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पण, ही आग एवढी भीषण होती की गोदामाचे छत व भींतही वितळून गेली. त्यानंतर एका कारजांलाही भीषण आग लागली. ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाला 10 तासांहून अधिकचा वेळ लागला. आग विझवल्यानंतर भूयाराची तपासणी केली असता तेलाची चोरी उजेडात आली.

हायटेक बोगद्याची बांधणी

गोदामाच्या आतील भागातून जवळपास 15 फूट खोलीवर बोगदा तयार करताना प्रथम जाळीदार फ्रेम लावण्यात आले. त्यात केवळ एका व्यक्तीलाच रांगत आत जाता येते. जवळपास 200 फूट लांब या बोगद्यात सव्वा इंच लोखंडाचा पाइप आयओसीच्या पाइपलाइनला जोडण्यात आला होता.

तसेच 2 इंचाचा एक प्लास्टिकचा पाइपही बोगद्यात टाकण्यात आला होता. आयओसीच्या पाइपलाइनची कनेक्टिव्हिटी डिस्टर्ब झाल्याच्या स्थितीत बोगद्यात काम करणाऱ्या व्यक्तीचा श्वास गुदमरू नये यासाठी एक्झॉस्ट फॅन व प्रकाशासाठी एलईडीही लावण्यात आली होती.

तज्ज्ञांच्या मते, या बोगद्याच्या माध्यमातून मागील 2 वर्षांत कोट्यवधींची तेल चोरी करण्यात आली. गोदामाचा मालक व अन्य आरोपी सध्या फरार आहेत.

गोदामालगत थर्माकॉलचे पोते ठेवण्यात आल्याचे दिसले. पण, या ठिकाणी त्याचे कोणत्याही प्रकारचे उत्पादन होत नव्हते.
गोदामालगत थर्माकॉलचे पोते ठेवण्यात आल्याचे दिसले. पण, या ठिकाणी त्याचे कोणत्याही प्रकारचे उत्पादन होत नव्हते.
भीषण आगीत गोदामाच्या आत उभे असणारे टँकरही वितळून गेले.
भीषण आगीत गोदामाच्या आत उभे असणारे टँकरही वितळून गेले.

दुर्गंधामुळे संशय बळावला

गोदामाला आग लागल्यानंतर परिसरात कच्चे तेल जळाल्याचा दुर्गंध पसरला. पहाटे 3 वा. लागलेली दुपारी 2 वाजेपर्यंत नियंत्रणात न आल्यानेही पोलिसांचा यामागे काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय बळावला. क्रेन बोलावून गोदामाच्या भींती पाडण्यात आल्या. त्यानंतरही एका कोपऱ्यात आग धूमसत होती.

गोदामाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाला मोठा घाम गाळावा लागला.
गोदामाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाला मोठा घाम गाळावा लागला.
बातम्या आणखी आहेत...