आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The BJP Had Plans To Establish Power In Nepal And Sri Lanka As Well, Tripura Chief Minister Viplav Deo Claimed

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय:नेपाळ, श्रीलंकेतही सत्ता स्थापण्याची भाजपची होती योजना, त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांचा दावा

आगरतळा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाची नेपाळ, श्रीलंका यांसारख्या शेजारी देशांतही विस्ताराची योजना आहे, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अमित शहा यांनी हे लक्ष्य निश्चित केले होते, असा दावा त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी केला आहे. ते राजधानी आगरतळा येथे पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीला संबोधित करत होते.

देव म्हणाले, ‘गृहमंत्री (अमित शहा) भाजपाध्यक्ष असताना आगरतळामध्ये एका बैठकीत आम्ही म्हटले होते की, आता संपूर्ण देशात पक्षाचा विस्तार झालेला आहे. पक्षाने अनेक राज्यांत सरकार स्थापन केले आहे.’ त्यावर ते (शहा) म्हणाले होते, ‘नेपाळ व श्रीलंका अद्यापही बाकी आहेत. आपल्याला तेथेही पक्षाचा विस्तार करायचा आहे आणि तेथेही जिंकायचे आहे.’ देव यांनी दावा केला की, प. बंगाल, केरळ व तामिळनाडूतही भाजप सरकार स्थापन करेल. त्रिपुरात पुढील ३० वर्षांपर्यंत सत्तेत राहू. देव यांच्या दाव्यावर विरोधी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माकपच्या केंद्रीय समितीचे सदस्य जितेंद्र चौधरी म्हणाले, ‘भाजपचे नेतृत्व शेजारी देशांच्या अंतर्गत प्रकरणांतही हस्तक्षेप करत आहे.’

बातम्या आणखी आहेत...