आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The BJP Will Set Up Three State wise Committees To Resolve The Grievances Of The Aggrieved

निवडणुकीआधी बंडखोरी रोखणार:नाराजांच्या तक्रारी सोडवण्यासाठी भाजप राज्यनिहाय तीन समित्या स्थापन करणार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपने बंडखोरी रोखण्यासाठी तयारी सुरू केली आहे. पक्ष पुढील वर्षी ९ राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी असंतुष्ट पदाधिकारी/ कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राज्य स्तरावर समिती स्थापणार आहे.

सूत्रांनुसार, सध्या केवळ निवडणुकीच्या वेळीच असंतुष्टांचे मन वळवण्याचे प्रयत्न केले जातात. तोवर उशीर झालेला असतो. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यानुसार, पुढील वर्षी जेथे निवडणूक होणार आहे, तेथे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात समिती काम करण्यास सुरुवात करेल.

समितीत राज्याच्या संघटन प्रभारीशिवाय अन्य दोन सदस्य असतील. समिती प्रत्येक विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या तालुका व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची यादी तयार करेल जिथे ते सरकारचे मंत्री, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नाराज आहेत. या तक्रारी दूर करण्यासाठी आतापर्यंत काय उपाय केले याची माहिती जमा केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...