आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
फाल्जिका जिल्ह्यातील अबाेहरमध्ये पडझड झालेल्या घरातील अाग विझविण्यासाठी दाखल झालेले अग्निशमन दलाचे पथक खोलीतील खाद्यपदार्थांसह कवटी पाहून स्तब्धच झाले. याची माहिती या पथकाने पाेलिसांना दिल्यावर त्यांनी घराचे मालक रवींद्र भाटिया (७०) यांची चाैकशी असता ते म्हणाले, ही कवटी १६ वर्षांपूर्वी निधन झालेल्या अापल्या अाईची अाहे. अापण घरात कबर खोदली व आईला पुरले. ९ वर्षांपूर्वी (२०१२) ८८ वर्षीय वडिलांचे निधन झाले तेव्हा तिच जागा पुन्हा खाेदली आणि आईची कवटी बाहेर काढून वडिलांना पुरले. २०१५ मध्ये बहिणीचा मृत्यू झाल्यावर वडिलांची कबर खाेदून हाडे काढली अाणि त्या जागी बहिणीचे दफन केले. भाटियांच्या म्हणण्यानुसार ते बालब्रह्मचारी अाहेत. निसर्गप्रेमामुळे अापण अाईचे घरातच दफन केले. घरातून हाडे निघाल्यानंतर अासपासच्या लाेकांनी त्याची तक्रार केल्याचेही दिसून अाले. परंतु तिघांच्या मृत्यूनंतर अापल्यालाही घरातच दफन करण्यात यावे या त्यांच्या इच्छेमुळे तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर अातापर्यंत प्रकरण थंड बस्त्यात हाेते. भाटिया यांनी आई-वडील आणि बहिणीचे मृत्यू प्रमाणपत्र पोलिसांकडे दिले आहे.
पदवीधर असल्याचा दावा, ४ महिन्यांतून एकदा अंघाेळ
रवींद्र भाटिया म्हणतात की, ते पदवीधर अाहेत. तीन-चार महिन्यांतून एकदाच अंघाेळ करतात. सहा वर्षांपासून घरात न गॅसची शेगडी ना वीज. ७० वर्षांच्या वयातही २० वर्षांच्या तरुणापेक्षाही जास्त ताकद असल्याचा दावा ते करतात. १९८५ मध्ये ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाला २,४०० चाैरस फुटांचे घर अाश्रमासाठी दिले हाेते. सध्या भाटिया यांना ७५० रुपयांची पेन्शन मिळत अाहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.