आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Body Was Exhumed 19 Days Later, Now The DNA Report Will Tell; Whether It Was Suraj Or Ramadan | Marathi News

एक मृतदेह, 2 दावेदार:19 दिवसांनी कबरीतून बाहेर काढण्यात आला मृतदेह, आता DNA रिपोर्ट सांगेल; तो सूरज की रमजान

कौशांबीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एक मृतदेह, दोन दावेदार. कौशांबी येथील एका मुस्लिम कुटुंबाने तरुणाचा मृतदेह रमजान म्हणून सुपुर्द-ए-खाक केला आहे. त्यावरच फतेहपूरच्या एका हिंदू कुटुंबानेही दावा केला. हा मृतदेह त्यांचा मुलगा सूरजचा असल्याचे ते सांगतात. दोन्ही कुटुंबीयांच्या दाव्यात पोलीस-प्रशासन संभ्रमात पडले आहे. सत्य जाणून घेण्यासाठी 3 जुलै रोजी कबरीत पुरलेला मृतदेह 19 दिवसांनी बाहेर काढण्यात आला.

मृतदेहाचे डीएनए नमुने घेण्यात आले. आता दोन्ही कुटुंबांचे नमुने मॅच करून पाहण्यात येणार आहेत. म्हणजेच आता हा मृतदेह सुरजचा आहे की रमजानचा, हे डीएनए चाचणीच्या अहवालावरून स्पष्ट होणार आहे.

11 जून रोजी दिल्ली-हावडा ट्रॅकवर मृतदेह आढळून आला होता
11 जून रोजी सैनी कोतवाली येथील दिल्ली-हावडा ट्रॅकवर तरुणाचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी तपास केला असता तरुणाने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. ओळखण्याचा प्रयत्न केला. मात्र ओळख पटू शकली नाही. यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पाठवण्यात आला.

हा फोटो मुस्लिम कुटुंबाकडून मिळालेल्या रमजानचा आहे.
हा फोटो मुस्लिम कुटुंबाकडून मिळालेल्या रमजानचा आहे.

14 जून रोजी मुस्लिम कुटुंबाने ओळख पटवली
14 जून रोजी कौशांबी येथील रहिवासी असलेल्या शब्बीरने मृतदेहाची ओळख पटवली. ते म्हणाले, "हा मृतदेह त्यांचा मुलगा रमजानचा आहे. तीन महिन्यांपूर्वी रमजान रागाच्या भरात घरातून निघून गेला होता. तेव्हापासून ते आपल्या मुलाचा शोध घेत होते. तरुणाचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडल्याची माहिती मिळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यानंतर ते पत्नी सफीकुल निशासोबत पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये पोहोचले. तिथे मृतदेहाची ओळख पटवली." त्यानंतर कायदेशीर प्रक्रियेनंतर पोलिसांनी रमजानचा मृतदेह ताब्यात दिला. कुटुंबीयांनी मृतदेह कबरीत दफन केला.

हिंदू कुटुंबाने 28 जून रोजी मृतदेहावर दावा केला
28 जून रोजी या प्रकरणात नवा ट्विस्ट आला. फतेहपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या संतराज सैनीने पोलिसांकडे धाव घेतली. त्यांनी सांगितले की, त्यांचा मुलगा सूरज 11 जून रोजी घरातून बेपत्ता झाला होता. हरवल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. तपासात मुलाच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन बनपोकरा गावाजवळ सापडले. बनपोकरा गावात पोहोचल्यानंतर तिथल्या लोकांनी सांगितले की, 11 जून रोजी एका तरुणाचा मृतदेह रेल्वे रुळावर सापडला होता.

हा फोटो हिंदू कुटुंबाकडून मिळालेल्या सूरजचा आहे.
हा फोटो हिंदू कुटुंबाकडून मिळालेल्या सूरजचा आहे.

यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी ट्रॅकवर सापडलेल्या मृतदेहाचा फोटो दाखवला. जो हुबेहूब सुरजसारखा दिसत होता. त्यांचा मुलगा सूरज (20 वर्षांचा) होता. बीएचे शिक्षण घेत होता.

दोन दाव्यांनंतर पोलीस-प्रशासनात गोंधळ
मृतदेहाचे फोटो, कपडे पाहिल्यानंतर संतराजने हा मृतदेह आपला मुलगा सूरजचा असल्याचा दावा केला. त्यांना मृतदेह परत मिळावा अशी मागणी केली. पोलिसांच्या हातातून हे प्रकरण डीएम कौशांबी यांच्यापर्यंत पोहोचले. दुसरीकडे, शब्बीर हा आपला मुलगा रमजान असल्यावर ठाम होते. दोन्ही कुटुंबांच्या दाव्यांदरम्यान, डीएमने चौकशीचे आश्वासन दिले. डीएमने सीओला चौकशीचे आदेश दिले. दोन दिवसांच्या तपासानंतर 30 जून रोजी सीओने डीएमला अहवाल दिला. डीएनए चाचणी केल्याशिवाय मृतदेहाची ओळख पटवणे कठीण असल्याचे लिहिले.

19 दिवसांनंतर, 3 जुलै रोजी, मृतदेह कबरीतून काढण्यात आला
डीएमच्या आदेशानंतर दोन्ही कुटुंबीयांना बोलावण्यात आले. 3 जुलै रोजी, मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला आणि डीएनए नमुना घेण्यात आला. दोन्ही कुटुंबातील सदस्यांचे केस, नखे, त्वचा आणि रक्ताचे नमुनेही घेण्यात आले. यानंतर मृतदेहावर पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आले. डीएनए नमुना लखनऊच्या प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे. आता अहवाल आल्यानंतरच कबरीत दफन असलेला मृतदेह कोणाचा आहे हे समजेल.

बातम्या आणखी आहेत...