आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Boy Killed His Mother By Firing 6 Bullets At Her For Not Allowing Her To Play

आईची हत्या:पब्जी खेळू न दिल्याने मुलाने 6 गोळ्या घालून केली आईची हत्या

लखनऊएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाइन पब्जी गेम खेळू न दिल्याने १६ वर्षांच्या मुलाने वडिलांच्या परवानाधारक बंदुकीतून ६ गोळ्या झाडून आईची हत्या केली. या वेळी त्याची १० वर्षांची बहीण तिथेच होती. मुलाने आईचा मृतदेह ३ दिवस घरातच लपवून ठेवला. दुर्गंधी घालवण्यासाठी रूम फ्रेशनर टाकत राहिला. पोलिसांनी मंगळवारी रात्री मृतदेह ताब्यात घेत मुलास अटक केली. ही घटना लखनऊच्या यमुनापुरम कॉलनीतील आहे.

हत्येची खोटी कथा रचली... : तिसऱ्या दिवशी दुर्गंधी वाढत चालल्यामुळे मुलाने वडिलांना फोन करून सांगितले की, एका इलेक्ट्रिशियनने आईची हत्या केली. तो ३ दिवसांपूर्वी रात्री आला आणि मला व बहिणीला खोलीत बंद केले. त्यानंतर आईला गोळी मारली. तो दोन दिवस घरीच थांबला. आधी मुलाने पोलिसांनाही हीच कथा ऐकवली, परंतु कसून चौकशी केल्यानंतर सत्य समोर आले.

ऑनलाइन गेम्सवर १५ देशांत बंदी, चीनमध्ये आठवड्यातून ३ तास मुभा
नवी दिल्ली| जगातील १५ देशांनी अनेक वर्षांपूर्वीच व्हिडिओ/ऑनलाइन गेम्सवर वेगवेगळे निर्बंध लादले आहेत. चीनमध्येही १८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले आठवड्यातून ३ तासांपेक्षा अधिक ऑनलाइन गेम खेळू शकणार नाहीत, असा नियम बनवला आहे. तथापि, चीन जगातील व्हिडिओ गेमची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. तर भारताने अजून ऑनलाइन गेम्ससंदर्भात कोणताही कठोर कायदा बनवला नाही. मात्र, भारताने पब्जीसारख्या चायनीज ऑनलाइन गेम्सवर दोन वर्षांपूर्वीच बंदी आणली आहे. परंतु अजूनही हे गेम उपलब्ध होत आहेत. इन्स्टिट्यूट आॅफ ह्यूमन बिहेविअर अँड अलाइड सायन्सचे माजी संचालक ते मूळचे वाराणसीचे. पोलिसांना मृतदेहाजवळ वडिलांची परवाना असलेली पिस्तुल सापडली. त्याची मॅग्झीन पूर्णपणे रिकामी होती. मुलाने मॅग्झीनमधील ६ गोळ्या आपल्या आईवर झाळल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

मोबाइलवर गेम खेळण्याचे व्यसन : सहायक पोलिस आयुक्त काशिम आबिदी यांनी सांगितले की, आरोपी मुलास मोबाइल गेम खेळण्याचे व्यसन होते. शनिवारी रात्रीही आईने त्याला गेम खेळण्यास नकार दिला. यामुळे तो नाराज होता. रात्री सुमारे २ वाजता आई झोपलेली असताना मुलाने वडिलांचे पिस्तुल काढले आणि गोळी झाडली.

धोकादायक : पबजी खेळणारी ६० टक्के मुले बंदूक चालवू इच्छितात
जेएएमए नेटवर्क ओपनच्या संशोधनानुसार, जी मुले बंदुका चालवण्याचे गेम खेळतात त्या मुलांची बंदूक पकडण्याची व ट्रिगर दाबण्याची अधिक इच्छा असते. २०० मुलांवर झालेल्या संशोधनात ५० टक्के मुलांना बंदुका नसलेले अहिंसक आणि ५० टक्के मुलांना बंदुका असलेले हिंसक गेम खेळायला दिले. काही वेळानंतर हिंसक गेम खेळणाऱ्या ६० टक्के मुलांनी लगेच बंदूक पकडली. तर अहिंसक गेम खेळणाऱ्या ४४ टक्के मुलांनीच बंदुक धरली.

बातम्या आणखी आहेत...