आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • The Budget Session Of Parliament From January 29, Will Present The Budget On February 1

नवी दिल्ली:29 जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय सत्र, 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडणार

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संसदेचे अर्थसंकल्पीय सत्र २९ जानेवारीपासून सुरू हाेणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता सर्वसाधारण अर्थसंकल्प मांडतील. अर्थसंकल्पीय सत्र दाेन भागांत आठ एप्रिलपर्यंत चालेल. लाेकसभा सचिवालयानुसार अर्थसंकल्पीय सत्राचा पहिला टप्पा २९ जानेवारीपासून सुरू हाेईल आणि १५ फेब्रुवारीपर्यंत चालेल. दुसरा टप्पा ८ मार्च ते ८ एप्रिल चालेल. राष्ट्रपती काेविंद २९ जानेवारीला सकाळी ११ वाजता संसदेच्या दाेन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला मार्गदर्शन करतील.

या सत्रात एकूण ३५ बैठका हाेतील. अर्थसंकल्पीय सत्राच्या वेळी काेविड- १९ च्या सर्व नियमांचे पालन केले जाईल. त्याचबराेबर संसदेच्या स्थायी समितीला विविध मंत्रालय व विभागांच्या अनुदानाच्या मागण्यांवर विचार करणे साेपे जावे यासाठी १५ फेब्रुवारीला सत्रातील पहिला टप्पा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ८ मार्चला दुसऱ्या टप्प्यातील बैठक सुरू हाेईल. काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या वेळी संसदेचे हिवाळी अधिवेशन घेण्यात येणार नाही. काेराेना संसर्गाचे प्रमाण वाढल्यामुळे या वेळी संसदेचे हिवाळी अधिवेशन हाेणार नाही असे सरकारने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...