आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Burden Of Backpacks Already On The Children Of The Country, It Does Not Want To Increase Further: High Court

याचिका फेटाळली:देशातील मुलांवर आधीच दप्तराचे ओझे, ते आणखी वाढवण्याची इच्छा नाही : हायकोर्ट

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक देश-एक शिक्षण बोर्ड स्थापनेची याचिका फेटाळली

देशातील १४ वर्षे वयापर्यंतच्या मुलांना सारखे शिक्षण मिळावे म्हणून एक देश-एक शिक्षण मंडळ स्थापन करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार देताना म्हटले, हा धोरणात्मक निर्णय आहे. न्यायालय यात हस्तक्षेप करू शकत नाही. देशातील शैक्षणिक यंत्रणेमुळे मुलांवर दफ्तरांचे ओझे अधिक आहे. सर्व अभ्यासक्रम एकत्र करून याचिकाकर्त्यास हे ओझे आणखी वाढवायचे आहे काय? न्या. चंद्रचूड म्हणाले, सर्व शिक्षण मंडळे बरखास्त करून एक बोर्ड स्थापन करण्याचा आदेश न्यायालयाने द्यावा, असे तुम्हाला वाटते का? तर असे आम्ही करू शकत नाही. याचिकाकर्त्याने सरकारकडे जाऊन त्यांचे म्हणणे मांडावे. तत्पूर्वी याचिकाकर्ता अाश्विनी उपाध्याय यांनी वस्तू व सेवाकर परिषदेच्या धर्तीवर (जीएसटी) राष्ट्रीय शैक्षणिक आयोग स्थापन करण्यासाठी उपाययोजना शोधावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.