आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा25 फेब्रुवारीला अँटिलियापासून काही अंतरावर सापडलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील के.एच. गिरी यांनी अनेक खुलासे केले आहेत. दैनिक भास्करशी बोलताना गिरी म्हणाले की, 2 मार्च रोजी मनसुख हिरेन सुमारे तीन तास माझ्याबरोबर होते. ते खूप मजबूत मनुष्य होते. त्या दिवशी ते आत्महत्या करतील असे मला कोणत्याही अँगलने वाटले नाही. मी म्हणेन की ते मुळीच आत्महत्या करणाऱ्यातील नव्हते. ते म्हणाले की एनआयएने उद्योगपती मुकेश अंबानी यांचे घर अँटिलियाजवळ स्फोटक स्कॉर्पिओ कार पार्कबद्दल माहिती विचारण्यासाठी मला कॉल केल्यास मी या तपासात सहकार्य करेल.
सचिन वाझे यांनी मनसुखला गिरींकडे पाठवले
गिरी हे तेच वकील आहेत ज्यांनी दोन मार्च रोजी मनसुख हिरेन यांची भेट घेतली आणि त्यांनी दक्षिण मुंबईतील मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या कार्यालयात पत्राचा मसुदा तयार केला होता, त्या आधारे विधानसभेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसुखचा खून झाल्याचा दावा केला होता. मनसुख यांनी गिरीसमोर या प्रकरणाशी संबंधित अनेक रहस्ये मांडली आहेत, त्यामुळे त्यांची साक्ष या संपूर्ण प्रकरणात अनेक मोठे खुलासे करू शकते. विशेष म्हणजे निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी मनसुख यांना अॅडव्होकेट गिरी यांच्याकडे पाठवले होते.
महाराष्ट्र ATS वकील गिरी यांचे निवेदन नोंदवले आहे
अॅडव्होकेट गिरी म्हणतात की त्यांनी 13 मार्च रोजी सकाळी 11 वाजता एटीएस कार्यालयात जाऊन काही माहिती दिली आहे. ते म्हणाले की 12 मार्च रोजी आपल्याला एटीएसची नोटीस मिळाली होती, त्यात एटीएसने त्यांना हिरेन आणि निलंबित सचिन वाझे यांच्याविषयी माहिती देण्यासाठी बोलवले होते. 13 मार्च रोजी सकाळी 11 वाजता ते एटीएसच्या कार्यालयात गेले होते. यादरम्यान, त्यांनी मनसुख आणि त्यांच्या दरम्यान घडलेल्या प्रोफेशनल गोष्टींबद्दल माहिती देण्यास नकार दिला. याशिवाय त्यांनी मनसुख यांना कायदेशीर सल्ला दिला. त्याला त्यांचा विशेषाधिकार म्हणून संबोधित करताना त्यांनी याबद्दल माहिती देण्यास असमर्थताही व्यक्त केली.
मनसुख आत्महत्या करू शकत नाहीत: गिरी
अॅडव्होकेट गिरी म्हणतात की मनसुख हिरेन त्यांना खूप धाडसी, सभ्य वाटले. भेटी दरम्यान त्यांच्यात निराशेसारखे काहीही नव्हते, म्हणूनच ते आत्महत्या करतील असे वाटत नाही. परंतू त्यांची एक तक्रार होती की, पोलिस आणि काही माध्यम कर्मचारी त्यांना कोणत्याही वेळी फोन करुन किंवा पोलिस स्टेशनमध्ये बोलवून चोरी झालेल्या स्कॉर्पिओविषयी चौकशी करुन त्रास देत होते. या सर्व गोष्टी असूनही ते आपल्या जीवनावर निराश दिसले नाही. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही निराशा दिसली नाही.
वकील सांगतात की, 2 मार्चला मनसुख त्यांच्या दक्षिण मुंबई येथील कार्यालयात जवळपास 3 तास होते. दुसऱ्या दिवशी 3 मार्चला ते काही महत्त्वाच्या कामासाठी गावाकडे गेले आणि 5 मार्चच्या संध्याकाळी फ्लाइटने मुंबईत परतले. 6 मार्चच्या सकाळी वृत्तपत्र आणि माध्यमांकडून मनसुख हिरेन यांच्या मृतदेह मुंब्राच्या रेती बंदर परिसरात सापडल्याची माहिती त्यांना मिळाली.
दैनिक भास्करने गिरी यांना विचारले हे प्रश्न, ज्यांचे त्यांनी अशी उत्तरे दिली....
प्रश्न : सचिन वाझे यांनाच NIA ने अटक केली आहे. तुम्ही याकडे कसे बघता?
उत्तर : हे प्रकरण आता खूप गुंतागुंतीचे झाले आहे. आता तपास यंत्रणाच याविषयी सांगू शकते की, काय चुक आणि काय बरोबर? सध्या कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे म्हणजे घाई होईल.
प्रश्न : मनसुख हिरेन यांच्यासाठी तुम्ही जे तक्रारपत्र तयार केले होते. मनसुख यांच्या कुटुंबाचे मत आहे की, ते सचिन वाझेंच्या दबावात तयार केले होते?
उत्तर : मनसुख हिरेन यांच्यावर तक्रारपत्र बनवण्यात सचिन वाझेंचा कोणताही दबाव नव्हता. ते स्टेटमेंट वकील या नात्याने मी बनवले होते. स्टेटमेंट बनवण्यासाठी माहिती देण्याचे काम मनसुख यांनी स्वतः केले होते. स्टेटमेंट तयार झाल्यानंतर मी त्यांना वाचून दाखवले आणि समजावले. यानंतरच त्यांनी स्टेटमेंटवर सही केली होती आणि मी ते स्टेटमेंट त्यांना सरकारी कार्यालयामध्ये रिसिव्हिंगग करण्यासाठी सोपवण्यासाठी दिले होते.
प्रश्न : NIA जर स्टेंटमेंट नोंदवण्यासाठी बोलेल तर तुम्ही ATS प्रमाने तिथेही जाणार का?
उत्तर : या पूर्ण प्रकरणात जर मला NIA कोणतीही माहिती देण्यासाठी बोलावले, तर मी अवश्य जाईल. मी जे कायदेशीररित्या सांगू शकतो. ते सांगितले आणि सहयोग करेल.
प्रश्न : तुमच्याकडे अशी कोणती माहिती आहे? जी देशहितात NIA ला देणे आवश्यक आहे? कारण मनसुख हिरेनने लिगल अॅडव्हायज तुमच्याकडून घेतली होती.
उत्तर : मनसुख हिरेनशी संबंधित प्रकरण दोन भागात विभागले गेले आहे. एक भाग स्फोटक आहे. कारण कारमध्ये स्फोटके म्हणजेच जिलेटिनच्या काठ्या सापडल्या. ही चौकशी एनआयए करत आहे. आणि दुसरा भाग हसमुख हिरेनच्या मर्डररचा आहे. ही तपासणी एटीएस करत आहे. एक वकील म्हणून मला वाटते की दोन भिन्न एजन्सी तपास करत आहेत, पण दोन्ही प्रकरणे एकमेकांशी संबंधित आहेत. म्हणून मला वाटते की फक्त एकाच एजन्सीने चौकशी केली तर बरे होईल. परंतु स्थानिक पोलिस किंवा एटीएस या प्रकरणाची चौकशी करू शकणार नाहीत कारण एनआयएला स्फोटक संबंधित प्रकरणांची चौकशी करण्याचे अधिकार दिले गेले आहेत आणि एनआयए या प्रकरणातील एका भागाची चौकशी करत आहे, तर मग त्या खटल्याच्या इतर भागाची चौकशी का सोडली पाहिजे? त्यांनी दुसर्या भागाचीही चौकशी केली पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.